ग्रामीण माणूस आणि संस्कृतीचे दर्शन: भुईभोग
भुईभोग हा शेतीनिष्ठ माणूस, माती आणि ग्रामीण संस्कृतीच्या पाऊलखुणेवर आधारित कवी संदीप जगताप लिखित काव्यसंग्रह पुण्याच्या अक्षर वाड्मय प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे ग्रामीण भागातील संस्कृती म्हणजे खेडोपाड्यातील लोकजीवन , रितीरिवाज , बोलीभाषा,सण उत्सव , शेतीवाडी करण्याच्या पद्धती हे सारे घटक ग्रामीण माणसांमध्ये मुरलेले असतात याचा प्रत्यय म्हणजे भुईभोग कृषी क्रांतीमध्ये शेती हा महत्त्वाचा भाग मानला जातो . शेतकरी हा तर साय्रा जगाचा पोशिंदा जो स्वता धरतीला माय मानत शेत पिकांचा बाप बनुन शेत मशागतीसाठी पिकात उगवलेलं तन काढून घेत सारे शिवार फुलवून लुसलुशीत करतो त्या बहरलेल्या फुलातील रसगंध भुंगेही चाखुन घेत भुक भागवतात व दाण्याने भरलेल्या कनसावर पक्षीही झेप घेतात हा प्रसंग पाहून बळीराजा भाऊक होतो त्याच डोलणारे पिकांचे आधारावर शेतकऱ्यांच्याही मणी कष्टाने स्वप्नं फुलतं जाते हे खरे परंतु ह्या जगाच्या पोशिंद्याला काही लुटारू लोकांच्या मनस्वी तनानं शेतमाल हमीभावा बाबत मातीलाच मिळतं केलं त्याच शोषण होत गेल ते कधी थांबेल हे भाकितच वर्तवली आहे .प्रतिकुल परिस्थिती मध्ये पोटापाण्याचा गंभीर प्रश्र्न बेतला असताना उद्योग धंद्याचे कोणतं साधन नसल्याने शेती मातीतच घाम गाळुन जीवन जगण्याची व्यथा आणि लुटारू लोकांच्या गैरव्यवहारामुळे कुणब्यावर बेतलेली दयनिय कथा हे सारे चित्रण कवितेच्या बोलक्या शीर्षकातून शब्दबद्ध झाले आहे
ग्रामीण संस्कृतीचा वारसा अनेक पिढ्यांपासून जपत आलेली संवेदनशील मनांची मानसं कवितेतुन व्यक्त होतात त्यांचा आवाज शेतमाल हमीभाव मिळावण्यासाठी मोर्चा , आंदोलन ह्या निशेधातुन व्यक्त होतो तर कुठे काही धार्मिक वृत्ती जोपासलेली माणसं तुकाराम गाथा वाचून घेत परंपरेनुसार गीता भागवतालाच भजत आलेली दिसतात शोषकांनी गीता भागवत ग्रंथ त्यांना सोईचे ठरवले शीवाय सहकारी वर्गामध्ये दलाली निर्माण झाली त्यामुळे कुनब्याच्या जीवनातील प्रत्येक क्षण ओरबाडला गेला सारे स्वप्न धुसर झाले .हे सारे सहण करून बळीराजा शेवटी गावातील वाड्यापाड्यावर वसलेल्या झोपडीतच स्थिरावतो बेतलेल्या दारिद्र्य त्याविषयी कुटूंबामध्ये आपापसात चर्चा करतो
कालच पावसाची
पहिली सर कोसळली
माझ्या झोपडीचं छप्पर
गळाया लागलं
भुईचे पोपडे निघालेत
कारव्याच्या कुडाची माती सुध्दा
ओली होऊन
सकाळ पर्यंत गळून जाईल
झोपडी हे ग्रामीण संस्कृतीचे प्रतीकच आहे कारव्याचा कुड करुन सजवलेल्या शेणामातीने लिपलेल्या ओलसर झोपडीत ग्रामीण संस्कृती निसर्ग नियमाला आधारावर नांदते दुष्काळी अवस्थेत भुक, गरिबी, उपासमारीचे दिवस लोटत शाळेत गेलेल्या मुलाला दुपारच्या वेळेची भाकर टोपलीत झाकुन ठेवत दुसऱ्याच्या शेतात मजुरीसाठी राबणारी माय तसेच स्वताच्या शेतामध्ये उन्हातान्हात हळ्या मारुन नांगराच्या पाळ्या घालणारा बाप त्याचे सालाभरातले निरनिराळे काम कपाळावरच्या रेशामध्येच लिहिलेलं असावं
या सालानं खुप काढली अंगावरची साल
असं वरीस गेलंय की
भिंतीवरची सुध्दा नसते
एवढी विषारी पाल
हे वर्णन म्हणजे माणूस म्हणून जगताना संकोच वाटवा अशा अपमान आणि अभावाचे होते तसेच माणूसकिच्या न्यायाची लढाई जिंकुन घेत ,मातीला वंदन करून समाजातील नातं घट्ट बांधनारेही होते.खेडोपाड्यात वस्ती करुन राहणारे माणसांची व्यसनाधीनता पोटातील भुकेची आग , प्रसंगी काम करणाऱ्या सोसायट्या, पतसंस्था, बॅंका, मतांसाठी लोकांच्या भेटीगाठी घेत मातीची शपथ घेऊन हापापलेला पुढारी ह्या सगळ्या प्रासंगिक गोष्टींची सुसंगत रित्या मिळकत असुनही हताश न होता भोगलेल्या दुःखाची जखम भरुन येण्यासाठी प्रभावी विचार म्हणुन पौराणिक संदर्भ देत महाभारतातील अर्जुन या मिथका सारखा निर्धार कर , युध्दाच्या काळी अर्जुनासारख अवसान गाळायच नसतं हे सुचक विधान सजगतेला आव्हान करते.भुईभोग मधील या सर्व बाबी बेकारीने खिन्न निराश झालेल्या माणसाच्या वास्तवाला अचुक भिडतात आपल्या ओघवत्या भाषाशैलीत कळकळीच्या आणि समाज हिताच्या जाणिवेतून भरलेल्या सगळ्या लोकांच्या जीवनातील वर्तमानकालीन सफर मोकळेपणाने घडवुन आणतात
आता आमचा जथ्या निघालाय
भुकेचे बेनर खांद्यावर घेऊन
दिल्लीच्या तख्ताला
आव्हान घ्यायला
फास घेऊन मरण्यापेक्षा
लढता लढता सरणावर जायला
हे सारे कवितेतील वर्णन म्हणजे एकुणच शोषणाच्या विरोधात भर रस्त्यावर उतरलेल्या शब्दांचा मोर्चा म्हणजे संदीप जगतापची कविता ही प्रतिभावंताचे प्रतिनिधी म्हणून नव्या पिढीचा वारसा जपणारी आहे.
- सुभाष नारायण कामडी , मु वांगण सु, पो पळसन, ता,- सुरगाणा
- ९५७९५४३३०८


