[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड येथे जागतिक मृदा दिन साजरा

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

जमिनीतील प्रमुख अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य व सूक्ष्म अन्नद्रव्य यांचे महत्त्व लक्षात घेऊन ,तसेच जमीनीच्या आरोग्य पत्रिकेनुसार खताची मात्रा द्यावी
– श्री.विलास सोनवणे, तालुका कृषी अधिकारी चांदवड

चांदवड येथे जागतिक मृदा दिन साजरा

चांदवड (प्रतिनिधी ) : – रासायनिक खते व पाण्याचा अनिर्बंध वापर,सेंद्रिय खतांचा अभाव आदि कारणांमुळे जामिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे.जामिनीचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी दिनांक ५ डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो.आज चांदवड तालुक्यात नवीन मध्यवर्ती प्रशासकीय भवनात जागतिक मृदा दिन कृषिभूषण श्री.शिवनाथ बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य डॉ.आत्माराम कुंभार्डे व श्री. विजय धाकराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या वेळी चांदवड तालुक्याच्या जमीन सुपीकता निर्देशांक फलकाचे अनावरण करण्यात आले..

फोटो - विक्रम देवरे

जागतिक मृदा दिनानिमित्त दिपप्रज्वलन करतांना डॉ.आत्माराम कुंभार्डे ,शिवनाथ बोरसे,विजय धाकराव,विलास सोनवणे आदि

जमिनीतील प्रमुख अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य व सूक्ष्म अन्नद्रव्य यांचे महत्त्व सांगण्यात आले,तसेच जमीनीच्या आरोग्य पत्रिकेनुसार खताची मात्रा द्यावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. जमिनीचा पीएच व सेंद्रिय कर्ब व जमिनीतील जिवाणू साखळीचा कसा संबंध आहे याबाबत तालुका कृषी अधिकारी श्री.विलास सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास राष्ट्रीय बागवानी अनुसंधान व विकास प्रतिष्ठानचे शास्त्रज्ञ श्री तुषार आमरे यांनी कांदा लागवड तंत्रज्ञान याबद्दल तसेच कांद्याचे बिजोत्पादन कार्यक्रम याबद्दल मार्गदर्शन केले. रिच फिल्ड फर्टीलायझर कंपनीचे श्री. उदय भोसले यांनी कांदा या पिकात विद्राव्य खतांचा वापर व फर्टिगेशन याबद्दल व नेटाफिम कंपनीचे कृषी विद्या शास्त्रज्ञ यांनी कांदा पिकात ठिबक सिंचनाचा वापर व त्याचे महत्त्व या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी श्री.अनिल मोकळ,श्री. श्रावगे,श्री.सायालेकर,आत्मा चे बीटीएम श्री.प्रमोद अहिराव, चांदवड तालुक्याचे प्रगतिशील शेतकरी सिद्धार्थ केदारे तसेच तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या