चांदवड : – आदर्श नूतन माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री बाळकृष्ण तुकाराम जाधव यांची चांदवड तालुका शिक्षक संघटना (TDF) कार्यकारिणी च्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विकास मंडळ मंगरुळ संस्थेचे कार्यवाह श्री विजय पुंजाराम पा. जाधव ,संस्थेचे पदाधिकारी तथा विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक माननीय श्री सुनील देशमुख यांचे शुभहस्ते शाल, श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सूर्यभान भांबर ,शिक्षक श्री पी.जी.जाधव ,श्री एम.एन.शिंदे,लिपिक श्री एस.व्ही. देशमुख सेवक श्री ए. व्ही. शिंदे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला.
चांदवड तालुका शिक्षक संघटना कार्यकारिणी संचालक पदी मंगरुळ विद्यालयाचे शिक्षक श्री बी. टी.जाधव यांची निवड झाल्याबद्दल सत्कार
श्री बाळकृष्ण तुकाराम जाधव यांची चांदवड तालुका शिक्षक संघटना (TDF) कार्यकारिणी च्या संचालक पदी निवड

