[masterslider id="2"]
राज्य लेख विशेष लेख संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

रानकवी ना. धो. महानोर

यांनी लिहिलेले सुभाष कामडी

पानझड काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार याशिवाय महाराष्ट्र शासनाचे गदीमा प्रतिष्ठानचा ग दी मा पुरस्कार यशवंतराव चव्हाण, संत नामदेव, आचार्य अत्रे, ना घ देशपांडे, कृषि भुषण, वनश्री पुरस्कार मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भुषविले आहे.

 

रानकवी  ना. धो. महानोर यांचा आज वाढदिवस

मराठी साहित्यामध्ये कविता माध्यमातून अनेक कविंनी प्रतिभाशैलीच्या अनुषंगाने निसर्ग सृष्टी भोवती फिरणाऱ्या दहाही ऋतुचक्रातील वेगवेगळे कंगोरे घेऊन शब्दबद्ध केले आहे.
तसे कवी यांचा आज 16 सप्टेंबर वाढदिवस आहे त्या निमित्ताने त्यांच्या काव्यसृष्टी बद्दल घेतलेला थोडक्यात धांडोळा.
कवी नामदेव धोंडी महानोर यांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या छोट्याशा खेड्यात झाला आज संपूर्ण महाराष्ट्राला रानकवी म्हणून परिचित आहेत खेड्यात जन्मलेल्या कवी महानोर यांची शेती व्यवसाय करीत असतानाच कविता शेतीच्या कामात गुंतलेले कवी मन हे हिरव्या बोलीचा शब्द घेऊन प्रकटले रानात प्राण गुंतवलेल्या या कवीच्या सुरवातीला कविता रानातल्या कविता या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून काव्यरसींकासमोर आल्या त्यातील निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्ग सौंदर्य हे कवितांचे भावविश्व वेगळेपण रशीक मणाला शीध्द झाले आहे. त्यांचे रानातल्या कविता, प्रार्थना दयाघना, पक्ष्यांचे लक्ष थवे, पानझड,तिची कहाणी,हे काव्यसंग्रह तसेच पळसखेची गाणी हा लोकगीत संग्रह प्रकाशित झाला आहे शीवाय गांधारी ही कादंबरी आणि गावाकडच्या गोष्टी हा कथासंग्रह अशी ग्रंथ संपदा प्रशीध्द आहे मराठी चित्रपटसृष्टीतही आपली कारकीर्द घडवली आहे . सर्जा, अबोली, विदूषक,दोघी, मुक्ता, या चित्रपटात त्यांनी गीतलेखन केले आहे शीवाय राजकीय क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकले आहे ते दोन वेळा विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले होते मराठी साहित्यातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महानोरांना भारत सरकारने 1991 साली पद्मश्री पुरस्कार मिळाला तसेच 2000 साली पानझड काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार याशिवाय महाराष्ट्र शासनाचे गदीमा प्रतिष्ठानचा ग दी मा पुरस्कार यशवंतराव चव्हाण, संत नामदेव, आचार्य अत्रे, ना घ देशपांडे, कृषि भुषण, वनश्री पुरस्कार मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भुषविले आहे. त्यांच्या साहित्यावर महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठात एम फिल, पी एच डी या पदव्यांच्या अभ्यासाच्या नावाखाली संशोधन झालेले आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

सुभाष नारायण कामडी
संशोधक
मो नं 9579543308

लेखकाबद्दल

सुभाष कामडी

एक टिप्पणी द्या