परदेशी यांच्या सामाजिक कार्याचे केले कौतुक
मनमाड येथील नेहरू रोड जुन्या देना बँक शेजारी पत्रकार सतीश परदेशी यांनी गेल्या चार महिन्यापासून सर्वसामान्य जनतेसाठी तसेच गोर गरीब नागरिकांसाठी दहारुपयांमध्ये दोन वडा ,दोन पाव अशी गोरगरिबांसाठी अत्यंत किफायतदार दराने सुरुवात केलेली असून लालसरे साहेबांनी त्याची दखल घेऊन जय महाराष्ट्र वडापाव सेंटर येथे भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले .तसेच आपण हा उपक्रम चालू ठेवावा, तसेच गोरगरीब जनतेच्या पोटाची भूक आपल्या माध्यमातून भरत आहे अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला पत्रकार सतीश परदेशी, पत्रकार विक्रम देवरे ,माजी नगराध्यक्ष भिमराव जेजुरे, सामाजिक कार्यकर्ता शुभम गायकवाड ,अशोक व्यवहारे, देवाशिष परदेशी ,सुरज व्यवहारे, ललित परदेशी, नामदेव सूर्यवंशी, राजू शेख आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

