[masterslider id="2"]
अध्यात्मिक कविता काव्य - संकलन काव्यरसास्वाद क्रीडा जाहिरात ज्ञानेश्वरीतील सुंदर प्रतिमाने मुख्य बातमी राज्य राष्ट्रीय लेख विशेष लेख संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या हितगुज हेल्थ

वाचकपीठ प्रतिष्ठानच्या काव्यचर्चेत ‘माती मागतेय पेनकिलर’ने घेतला साहित्यिक झोत

यांनी लिहिलेले ग्राम चैतन्य

“माझं आयुष्य दोन टोकांवर उभं आहे, एका बाजूला चांदवड येथील कृषी निविष्ठा विक्री केंद्राचं व्यावसायिक जग, दुसरीकडे कवितेचा संवेदनांचा प्रवास. या दोन्हींमधून मातीचा जिवंत आवाज उमटतो, जो रोमँटिक ग्रामीणपणा नसून लाईव्ह वास्तव आहे.”  सागर जाधव जोपूळकर यांनी सामाजिक आशयाच्या, तरुणांच्या व्यथा मांडणाऱ्या दोन कविता वाचून प्रेक्षकांना ग्रामीण वेदनेचा स्पर्श करून दिला.

वाचकपीठ प्रतिष्ठानच्या काव्यचर्चेत ‘माती मागतेय पेनकिलर’ने घेतला साहित्यिक झोत

ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार डॉ. मुकुंद कुळे (मुंबई)

ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार डॉ. मुकुंद कुळे (मुंबई)

चांदवड: वाचकपीठ प्रतिष्ठानच्या एकाहत्तराव्या (७१ व्या) दृक्-श्राव्य मासिक काव्यचर्चा सागर जाधव जोपूळकर यांच्या ‘माती मागतेय पेनकिलर’ या कवितासंग्रहावर नुकतीच यशस्वीरीत्या पार पडली. फेसबुक लाईव्ह आणि गुगल मिटद्वारे ऑनलाइन झालेल्या या प्रगल्भ चर्चासत्राला ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार डॉ. मुकुंद कुळे (मुंबई) हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख भाष्यकार कवी श्रीकांत ढेरंगे (संगमनेर), प्रा. डॉ. रमेश माने (अमळनेर), कवी शशिकांत शिंदे (अहिल्यानगर) यांचा सहभाग होता. कवी सागर जाधव जोपूळकर यांनी मनोगत मांडले, कविता वाचन केले. वाचकपीठाचे भास्कर निर्मळ, मारुती सावंत, चंद्रकांत भोसले, भानुदास महानूर, किरण भावसार, डॉ. संजय थोरात, साहेबराव तुपे, डॉ. अविनाश कदम, योगिता राजकर, शरद ठाकर, दादा ननवरे, संदीप काळे, माधुरी चौधरी, गिरीश सोनार या सक्रिय सदस्यांनी आयोजन सांभाळले.

दादा ननवरे

दादा ननवरे

काव्यचर्चेचा व्हिडिओ संपूर्ण बघण्यासाठी इथे क्लिक करा

कवी सागर जाधव जोपूळकर (चांदवड) यांनी मनोगतात सांगितले, माझं आयुष्य दोन टोकांवर उभं आहे, एका बाजूला चांदवड येथील कृषी निविष्ठा विक्री केंद्राचं व्यावसायिक जग, दुसरीकडे कवितेचा संवेदनांचा प्रवास. या दोन्हींमधून मातीचा जिवंत आवाज उमटतो, जो रोमँटिक ग्रामीणपणा नसून लाईव्ह वास्तव आहे.”  सागर जाधव जोपूळकर यांनी सामाजिक आशयाच्या, तरुणांच्या व्यथा मांडणाऱ्या दोन कविता वाचून प्रेक्षकांना ग्रामीण वेदनेचा स्पर्श करून दिला.

श्रीकांत ढेरंगे (संगमनेर)

श्रीकांत ढेरंगे (संगमनेर)

प्रमुख भाष्यकार श्रीकांत ढेरंगे (संगमनेर) यांनी संग्रहाची रचना, मुक्तछंद, अभंग यांचे कौतुक करत म्हटले, ग्रामीण काव्यप्रवाहात सागर जाधव यांची कविता टाळसार उगवलेली आहे. जुन्या नव्या, ग्रामीण शहरी शब्दसंपदेच्या मिश्रणाने स्वतंत्र भाषा घडवली आहे, जी वास्तवतेची प्रखर किनार देतो.” प्रा. डॉ. रमेश माने (अमळनेर) यांनी प्रतिमाविश्लेषण करत सांगितले, ओसाड शिवार, खतांचा मारा, नैसर्गिक प्रयोग या कवितांतून मातीचं आईपण आणि सृजनशक्ती सिद्ध होते. हा शेतकऱ्याच्या दैन्यामधील चिकाटीचा पुरावा आहे.”  श्रीकांत ढेरंगे व डॉ. रमेश माने यांनी संग्रहाला समकालीन ग्रामीण कवितेचे नवे पर्व म्हणून अधोरेखित केले.

प्रा. डॉ. रमेश माने (अमळनेर)

प्रा. डॉ. रमेश माने (अमळनेर)

कवी शशिकांत शिंदे (अहिल्यानगर)

कवी शशिकांत शिंदे (अहिल्यानगर)

अध्यक्षस्थानी असलेले डॉ. मुकुंद कुळे यांनी, सागर जाधव जोपूळकर यांच्या कवितांत माती ही केवळ प्रतीकात्मक नाही तर जिवंत व्यक्तिमत्त्व आहे. रासायनिक शेतीच्या विषारी प्रभावाचा, मातीच्या सहनशील आईपणाचा, कुणबी शेतकऱ्याच्या कणखर स्वराचा एक्स–रे घेऊन त्यांनी समाजव्यवस्थेकडून हिशोब मागितला आहे’’ असे प्रतिपादन केले.  संग्रहातील ओसाड शिवार, खतांचा मारा, नैसर्गिक प्रयोग या प्रतिमांचं गहन विश्लेषण करून ग्रामीण काव्यप्रवाहाला नवे आयाम मिळाल्याचे प्रतिपादन केले.

वाचकपीठाचे सदस्य कवी शशिकांत शिंदे (अहिल्यानगर) यांनी दूरस्थ अभिप्रायात म्हटले, संग्रहाने शेतकरी मातीच्या नात्यातील करुणा आणि चिकाटी अधोरेखित केली आहे. घोषणाबाजी नसून अस्वस्थ शांततेतून प्रश्न विचारणारी ही कविता आहे.” यावेळी दादा ननावरे यांनी प्रास्ताविकात सांगितले, ग्रामीण संवेदनेच्या या कवितेने काव्यचर्चेची अपेक्षा पूर्ण केली. अशा उपक्रमांमधून नव्या कवींना प्रोत्साहन मिळते.” किरण भावसार यांनी आवाहन केले, मराठी साहित्याच्या चाहते व रसिकांनी अशा चर्चा अनुभवाव्यात.”

माधुरी चौधरी

माधुरी चौधरी

आयोजक सदस्य भास्कर निर्मळ, मारुती सावंत, चंद्रकांत भोसले, भानुदास महानूर, डॉ. संजय थोरात, साहेबराव तुपे, डॉ. अविनाश कदम, योगिता राजकर, शरद ठाकर, दादा ननवरे, संदीप काळे, गिरीश सोनार यांनी सत्र सांभाळले. शर्मिला गोसावी यांनी सूत्रसंचालन केले तर माधुरी चौधरी यांनी आभार व्यक्त केले.  ही चर्चा सागर जाधव जोपूळकर यांच्या साहित्यिक वाटचालीला नवे परिमाण देणारी ठरली.

शर्मिला गोसावी

शर्मिला गोसावी

लेखकाबद्दल

ग्राम चैतन्य

एक टिप्पणी द्या