गाळणा किल्लावर स्वच्छतेची मोहीम राबवून गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचे महत्त्व जपण्यासाठी झगडताहेत ‘शिवकार्यच लय भारी,समूह ‘आणि’ रणझुंजार मराठा जागर’ हे दोन समुह
चांदवड : – शिवकार्यच लय भारी,समूह आणि रणझुंजार मराठा जागर या दोन शिवसमूहांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी दोन गडकिल्ल्यांवर स्वच्छता आणि संवर्धन छत्रपतींचा जाज्वल इतिहास अजून समजावा यासाठी मोहिमा काढल्या जातात…तशीच आत्ताच ७ वी मोहीम मालेगाव तालुक्यातील गाळणा किल्ल्यावर मोहीम पार पडली…
ह्या मोहिमेत दिपक गांगुर्डे,अनिता नळे,सुभाष जेधे,अतुल कासव,शंकर वाबळे,भगवान नाईकवाडे,चंद्रकांत गांगुर्डे,उत्तम नळे,दीप्ती आडेप,सागर गांगुर्डे,वनिता घोगरे,अविनाश कलोर, योगेश पगार,प्रमिला गांगुर्डे,कुंडलिक चौरे,निरंजन घोगरे आदींनी सहभाग घेतला होता…सर्वत्र ह्या संकल्पनेच कौतुक होत आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या महाराष्ट्राच्या विविध भागांतील लोक ह्या शिवकार्यात सहभागी होत असतात आणि जोडत आहे.ह्या मोहिमेत विविध क्षेत्रातील शिवप्रेमी जोडत आहे.पुणे,संगमनेर,शिर्डी,कोपरगाव,दरेगाव,कळवण,मालेगाव,सातारा, मुंबई,नाशिक,कोल्हापूर,जालना,औरंगाबाद येथून मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी ह्या गडकोट मोहिमांत सहभागी होत असतात.
तसेच ह्याच शिवकार्यच लय भारी,समूहाने कोरोना काळात online व्याख्यानमाला घेऊन अखंडित 100 भाग पूर्ण करून रेकॉर्ड केला आहे.हा whatsapp समूह वर्षभर असे सामाजिक उपक्रम राबवत असतो.

