[masterslider id="2"]
मुख्य बातमी राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

अनधिकृत कलमांचे उत्पादन व विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई

कृषि विद्यापीठांची शिफारस न केलेल्या वाणांची लागवड केल्यास शेतकऱ्यांना भविष्यात आर्थिक नुकसान होवू शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी शिफारस केलेल्या वाणाची लागवड करावी.
– दिलीप देवरे
उपविभागीय कृषी अधिकारी

अनधिकृत कलमांचे उत्पादन व विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई

मालेगाव (राजेंद्र तळेकर,) : – उपविभागीय मालेगाव अंतर्गत अधिकृत परवाना न घेता कलमांचे उत्पादन व विक्री करण्याचा प्रकार उपविभागातील तिनही तालुक्यात क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांचे निदर्शनास आल्यास अशा अनधिकृत कलमे उत्पादन व विक्री करणाऱ्या व्यक्तीवर महाराष्ट्र फळांचे रोपमळे (नियमन) अधिनियम 1969, नियम 1976, नियम 1978 व सुधारीत नियम 1980 मधील नियम क्र.13 (ड) नुसार संबंधित व्यक्तीवर शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबाबत नियमानुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती परवाना अधिकारी तथा उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तंत्र अधिकारी गोकुळ अहिरे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

शासनाच्या कृषी विभागातंर्गत मालेगाव, सटाणा व नांदगाव तालुक्यातील शेतकरी उच्च उत्पादनाचा स्त्रोत म्हणून फळबाग लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळत आहे. त्यामुळे शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत फळबाग लागवड, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी कृषी विभागाच्या शासकीय, कृषी विद्यापीठाकडील संशोधन केंद्र येथून शासकीय परवाना व खाजगी नोंदणीकृत फळरोपवाटीका वरुन कलमे शेतकऱ्यांनी स्वत: विकत घेऊन लागवड करण्याची आहे. शेतकऱ्यांनी दर्जेदार उच्च गुणवत्तेचे कलमे उपलब्ध् होण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी यांना शासनाने फळझाडे रोपवाटिका परवाना अधिकारी म्हणून घोषित केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या परवान्यावर शासकीय रोपवाटिका किंवा कृषी विद्यापीठ संशोधन केंद्र किंवा कृषी विज्ञान केंद्र येथून डाळींब, आंबा व पेरु कलमांची उचल करुन लागवड केलेली असेल व लागवडीपासून मातृवृक्षाचे लागवडीपासून डाळिंब, पेरु साठी वय 3 वर्ष व आंबा 5 वर्ष पूर्ण झालेले असतील अशा शेतकऱ्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाकडे खाजगी नोंदणीकृत रोपवाटिका परवाना मिळण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करुन प्रस्ताव सादर करावा. सदर मातृवृक्षाची कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ व उपविभागीय कृषी अधिकारी मालेगाव कार्यालय समितीमार्फत तपासणी होवून फळरोपवाटिका परवाना दिला जाईल.

महाराष्ट्र फळांचे रोपमळे (नियमन) अधिनियम 1969 नियम 1976 व सुधारित नियम 1978 अन्वये उपविभागीय कृषी अधिकारी मालेगाव कार्यालयामार्फत यापूर्वी उपविभागातील खाजगी नोंदणीकृत रोपवाटिकांना फळझाड परवाने दिलेले आहेत अशा फळरोपवाटिका धारकांनी ज्या फळपिकासाठी परवाना घेतला आहे, त्याच फळपिकाचे कलमे उत्पादन व विक्री करावी त्या व्यतिरीक्त इतर फळपिकांचे कलमे उत्पादन व विक्री करण्यात येवू नये. उपविभागात अनधिकृत फळरोपवाटिकांमधून कृषी विद्यापीठांनी शिफारस न केलेल्या फळपिकांच्या वाणाची कलमे उत्पादित व विक्री करु नये. कृषि विद्यापीठांची शिफारस न केलेल्या वाणांची लागवड केल्यास शेतकऱ्यांना भविष्यात आर्थिक नुकसान होवू शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी शिफारस केलेल्या वाणाची लागवड करावी. असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तंत्र अधिकारी गोकुळ अहिरे यांनी केले आहे

लेखकाबद्दल

राजेंद्र तळेकर

एक टिप्पणी द्या