कोरोना काळात आरोग्य कर्मी व पोलीसांचे योगदान उल्लेखनीय: पालकमंत्री छगन भुजबळ
चांदवड : – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समाना करतांना आरोग्य कर्मी व पोलीस यंत्रणांचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे. असे गौरोद्वगार राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी काढले आहे. आज चांदवड उपजिल्हा रूगणालय येथे ऑक्सिजन जनरेशन प्लाँन्टचे उदघाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार शिरीष कोतवाल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशिल शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव आदींसह रूग्णालयातील आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोना साथरोगाची दुसरी लाट महाभयंकर होती. यात अनेक लोक मृत्यूमुखी पडले. या आजारातून बरे होणाऱ्या रूग्णांना म्युकरमायकोसिस सारख्या आराजाने ग्रासले. या लाटेत रूग्णसंख्या संपूर्ण राज्यात जास्त असल्याने ऑक्सिजन टंचाईचा ही सर्वांनाच सामना करावा लागला आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यात 29 ठिकाणी ऑक्सीजन जनरेशन प्लॉन्टची उभारणी होत असून, जिल्हा ऑक्सीजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत असल्याचेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले आहे.
श्री. भुजबळ यावेळी म्हणाले की, चांदवड तालुक्यात 9 हजार 455 रूग्ण बाधीत झाले होते त्यातील 9 हजार 88 रूग्ण बरे झाले तर 328 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ऑक्सीजनची गरज लक्षात घेवून जिल्ह्यात सर्वच शासकीय रूग्णालयांमध्ये ऑक्सीजन जंबो सिंलेंडर, ऑक्सीजन ड्यूरा सिलेंडर्स, ऑक्सीजन कॉन्टेसर्स, लिक्वीड ऑक्सीजन सिंलेंडर्स यांची गरजेनुसार व्यवस्था आज करण्यात आली आहे.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशिल शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, आज उद्घाटन झालेल्या पीएसए ऑक्सिजन प्लॉन्टची साठवणूक क्षमता पन्नास हजार लीटर असून, दिवसाला 50 ते 60 जंबो सिलेंडर याद्वारे भरली जाऊ शकतात. उपजिल्हा रूग्णालयात 33 जंबो सिलेंडर्स व 3 ड्यूरा सेल आजरोजी उपलब्ध आहे. आता ऑक्सीजन प्लॉन्ट कोरोनाशी सामना करण्यासाठी सज्ज झाला असून, वीज गेल्यानंतर पर्यायी व्यवस्था म्हणून 50 जंबो सिंलेडर्सद्वारे रूग्णांना ऑक्सीजन पुरवठा करता येणार आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यात सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये औषधांचा साठाही मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, ऑक्सिजन जनरेशन प्लॉन्टच्या माध्यमातून आगामी काळात ऑक्सिजनचा तुटवडा नक्कीच भासणार नाही, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्र्वभूमीवर जिल्ह्यात साडे तीनशे मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती ची व्यवस्था केली असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
चांदवड येथे तयार करण्यात आलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लांट क्षमता प्रति मिनिट तिनशे चाळीस लिटर ऑक्सिजन ची निर्मिती होणार आहे.चोवीस तासाच्या कालावधीत या प्लांटच्या माध्यमातून पन्नास ते साठ ऑक्सिजन सिलेंडर ची निर्मिती होणार आहे.या माध्यमातून रुग्णालयात एका वेळी किमान पन्नास ते साठ रुग्णांना पुरविणे शक्य होणार आहे.या प्लांटमुळे उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था झाली आहे.यावेळी बोलताना त्यांनी आरोग्य विभागात काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेसह सर्वच कर्मचा-यांनी कोविड काळात केलेल्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. याकाळात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांबरोबरच पोलिसांनी देखील उल्लेखनीय कार्य केल्याचे सांगताना च नागरिकांनी काळजी घेऊन तिसरी लाट रोखण्यासाठी गर्दी टाळायला हवी असे आवाहन देखील त्यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश शेळके, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष उत्तम आहेर, नगरसेवक अलताफ तांबोळी,गंगावेचे सरपंच भाऊसाहेब शेलार, बाळासाहेब जाधव, रिजवान घासी , सुरेश गांगुर्डे, आदींसह कार्यकर्ते, डॉ राजपूत, डॉ देवढे आदींसह आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

