मनमाडच्या हनुमान ट्रेकर्सने केला साल्हेर किल्ला सर

सह्याद्री पर्वत रांगेतील साल्हेर-मुल्हेर या जोडीतला हा साल्हेरचा किल्ला असून किल्ल्याची उंची 5175 फूट आहे , नाशिक जिल्ह्यामधील 66 गिरिदुर्गामध्ये सर्वात उंच किल्ला हा साल्हेर आहे.
किल्ल्याच्या माथ्यावरच्या पठारावर एक उंच टेकडी आहे.या टेकडीवर भगवान परशुरामाचे मंदिर आहे. गडाच्या उत्तर अंगाला असलेल्या पठारावर विस्तीर्ण आकाराचा गंगासागर तलाव आहे. गंगासागर तलावाशेजारी गंगा -यमुना टाके आहे. ह्यांचे पाणी व गंगोत्री -यमनोत्री च्या उगमाचे पाणी सारखे आहे असे डॉ. रघुराज महाराज ह्यांनी शोधले होते. टेकडीच्या वाटेवर गुहा आहेत.
गडाच्या पायथ्याला साल्हेर निवासिनी गडकलिका देवीचे सुंदर मंदिर आहे . तसेच गृहस्वरूप अमृताभवानी व सिद्धिविनायक गणेश मंदिर आहे. गडाच्या माथ्यावर गुहेत दत्त व हनुमान मंदिर आहे. तसेच माथ्यावर मंदिर रेणुका देवीचे असून ही परशुरामाची माता आहे. या माथ्यावरूनच बाण मारून परशुरामाने कोकणची निर्मिती केली. माथ्यावरील दोन खळगे म्हणजे परशुरामाची उमटलेली पावले आहे.
समोर छिद्र पडलेला डोंगर म्हणजे कंडाणा किल्ला आहे. साल्हेर गडाचे स्थान आणि उंची यामुळे आजुबाजुला असलेला विस्तीर्ण मुलुख न्याहाळणे आनंददायी ठरते. विशेष म्हणजे हनुमान ट्रेकर्स ग्रुप ने संपूर्ण किल्ल्याला प्रदक्षिणा घातली.
सदर मोहिमेत मनमाड चे मा. नगराध्यक्ष बबलुभाऊ पाटील, डॉ. योगेश मगर, डॉ. भाऊराव देवरे, राजेंद्र नागरे, गणेश आहेर, किरण भाबड, भागवत झाल्टे, विशाल पाटील, रवी छाजेड, संदेश उगले, श्रेयस देवरे ( वय वर्षे 8) यांनी सहभाग घेतला व मोहीम यशस्वी झाली.

