[masterslider id="2"]
राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड-देवळा तालुक्यातील सीमेवर गिरणारे बारीत बिबट्याने केले घोडे व शिंगरु फस्त

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड-देवळा तालुक्यातील सीमेवर गिरणारे बारीत बिबट्याने केले घोडे व शिंगरु फस्त


चांदवड : – देवळा तालुक्यातील गिरणारे शिवारात व चांदवड तालुक्यातील दरेगाव या गावाजववळील मनमाड-उमराणे या राज्य महामार्गावरिल गिरणारे घाटातुन जाणाऱ्या रस्त्याच्या लगतच असलेले दरेगाव रहिवासी शेतकरी विनोद गांगुर्डे यांच्या गिरणारे शिवारातील शेतावर सोमवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तिथे चरत असलेल्या घोडा व एक शिंगरु यांना जीव गमवावा लागला . सकाळच्या सुमारास येथील शेतकरी बाजीराव गायकवाड हे शेतात गेले असता त्यांना शिंगरु किंकाळत असल्याचे दिसून आले. मात्र घोडयाने आधीच आपला प्राण सोडला होता. त्यानंतर काही क्षणात शिंगरु ही मुत्युमुखी पडले. हल्ल्यात घोडा बर्याच प्रमाणात बिबट्याने खाल्ला होता तर शिंगरुचा गळा चिरून रक्त पिल्याचे लक्षात आले.
सदर बिबट्याचे पावलं पाहता तो वाघ असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणनं आहे. मात्र वनविभागाने तो बिबट्या असल्याचे सांगितले आहे. सदर बिबट्याच्या पावलांबरोबरच त्याच्या बछड्याचेही पावलं दिसत असतांना बिबट्या बरोबरच
बछडे सुध्दा असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणने आहे. यावेळी देवळा वनविभागाच्या वनरक्षक ज्योती सोनवणे,वनमजुर ईश्वर ठाकरे यांनी पंचनामा केला. व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या कडे शवविच्छेदनासाठी घोडे व शिंगरु दिले. यावेळी दरेगावचे पोलीस पाटील सोमनाथ गांगुर्डे, गिरणारे येथील ईश्वर पाटील आदी उपस्थित होते. बिबट्याच्या संचारामुळे परिसरात भितीदायक वातावरण आहे.

बिबट्याची पावले

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

टिप्पणी

  • साप्ताहिक ग्राम चैतन्य ,या साप्ताहिकाचे संपादक विक्रम देवरे, यांच्या साप्ताहिक मधील बातम्या या परिसरातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांच्या जिवनात घडणाऱ्या दैनंदिन ज्वलंत घटना संदर्भात,व जिवनाशी निगडित असतात, भविष्यात साप्ताहिक ग्राम चैतन्य ची खुप खुप प्रगती व्होहो.ही सदिच्छा!!!.

एक टिप्पणी द्या