[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

दीपावली निमित्त नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव ता.चांदवड. जि. नाशिक. शाळेत “पेपरडीश पासून पर्यावरण पूरक आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा संपन्न.

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

आज शनिवार दि.२३ ऑक्टोबर २०२१. रोजी नूतन माध्यमिक विद्यालयात दीपावली निमित्ताने “पेपरडिश पासून पर्यावरण पूरक आकाशकंदील” बनविण्याची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेस विद्यालयातील इयत्ता ५ वी ते ८ वी तील एकूण १२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अत्यंत सोप्या पद्धतीने कागदी डिश पासून विद्यार्थ्यांनी उत्साहाने व आनंदाने आकर्षक आकाश कंदील तयार केले.
या कार्यशाळेत कलाशिक्षक श्री.देव हिरे सर यांनी विद्यार्थ्यांना आकाश कंदील बनविण्याचे मार्गदर्शन केले. तसेच शाळेचे पर्यवेक्षक श्री.कृ.बा.लोखंडे सर यांनी विद्यार्थ्यांना सूचना व माहिती दिली.कार्यशाळेस शाळेचे जेष्ठ शिक्षक श्री.आ.वि. सोनवणे सर, श्री,सावंत सर,श्री.पाटील सर,श्री.एस.आर.जाधव सर,सौ. सोनवणे मॅडम,सौ.शिंदे मॅडम,,सर्व शिक्षक कर्मचारी वृंद उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या