‘चांदवडी रुपय्या’ पुरस्कार वितरण व गुणगौरव सोहळा संपन्न

चांदवडी रुपय्या साहित्य कला रसिक मंडळ आयोजित गुणगौरव सोहळा चांदवडच्या सार्वजनिक वाचनालयात नुकताच संपन्न झाला.

कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून डॉ राजेंद्र मलोसे, तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ समीक्षक डॉ एकनाथ पगार व डॉ जयवंत भदाणे उपस्थित होते.

कार्यक्रमात ‘चांदवडी रुपय्या साहित्य प्रेरणा पुरस्कार’ युवा साहित्यिक प्रशांत भरवीरकर यांना तर ‘सामाजिक प्रेरणा पुरस्कार’ धोडंबे येथील हिंदूहृदयसम्राट मित्र मंडळ या निसर्गप्रेमी ग्रुपला प्रदान करण्यात आला..


‘चांदवडी रुपय्या’ मंडळाने आयोजित केलेल्या ‘कविता लेखन स्पर्धेतील’ बाल गटात प्रथम क्रमांक श्रुती शिंदे, द्वितीय क्रमांक वैष्णवी माळी, तृतीय क्रमांक वैष्णवी पवार, उत्तेजनार्थ पारितोषिके दीक्षा गांगुर्डे व साई शिंदे या बालकांना
तर खुल्या गटातील कविता लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक कवी प्रफुल्ल सोनवणे, द्वितीय क्रमांक सौ मनीषा शिंदे, तृतीय क्रमांक कु. रोशनी खैरनार, उत्तेजनार्थ पारितोषिक कु. साक्षी कांबळे या विजेत्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व पुस्तके देऊन गौरविण्यात आले
या कार्यक्रमादरम्यान चित्रकार देव हिरे यांनी केलेल्या फलक रेखाटनाच्या वर्ड रेकॉर्डबद्दल त्यांचे प्रमुख अतिथी डॉ पगार यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.

तसेच बाल दिनाचे औचित्य साधून कवी रावसाहेब जाधव यांच्या त्रैभाषिक बालकविता संग्रह ‘गरगर मोळ्या’ चे प्रकाशन डॉ. एकनाथ पगार यांच्या हस्ते तर ग्राम चैतन्य दिवाळी अंकाचे प्रकाशन डॉ. जयवंत भदाणे यांच्या हस्ते संपन्न झाले. सोबत चपराक प्रकाशनच्या दिवाळी अंकाचे स्वागतपर प्रकाशन देखील सागर जाधव जोपुळकर यांच्या सहयोगाने पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाले.




कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब जाधव यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय कवी रवींद्र देवरे, मधुकर रौदळ, संजय पाडवी, संदीप गुजराथी यांनी करून दिला तरसुत्र संचालन शांताराम हांडगे यांनी केले.
कार्यक्रमात मंडळाचे सचिव सागर जाधव जोपुळकर, अध्यक्ष रावसाहेब जाधव यांच्यासोबत कवी प्रफुल्ल सोनवणे, कवी राजेंद्र पगारे, कवी अविनाश वाघ, कवी वाल्मिक सोनवणे, कवी संजय पाडवी, कवी संदीप गुजराथी, कवयित्री सविता दरेकर, कवयित्री सविता दिवटे, कवी सोमनाथ पगार, लेखिका वैशाली जाधव, अजित जाधव, बाळकृष्ण जाधव, चित्रकार देव हिरे, सूरज माने, करण सोनी, माणिक गांगुर्डे, भगवंत बोरगुडे आदीं उपस्थित होते



