[masterslider id="2"]
राज्य लेख संमिश्र वार्ता हितगुज

हिंदुत्ववादी विचारांचा विस्तव म्हणजे बाळासाहेब ठाकरे

यांनी लिहिलेले सुभाष कामडी

हिंदुत्ववादी विचारांचा विस्तव म्हणजे बाळासाहेब ठाकरे

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी निमित्त आज शिवतिरर्थावर लाखो शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे अनुयायी एखाद्या यात्रेप्रमाणे दरवर्षी मोठ्या संख्येने बाळासाहेबांच्या स्मृतिला अभिवादन करण्यासाठी गर्दी करतात ही बाब लक्षात घेतली तर बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण, वकृत्व, विचार हे प्रतिष्ठित माणसापासून ते खेड्यातील सामान्य माणसाला आदर्श निर्माण करणारे आहेत बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी मुंबई येथे झाला प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे त्यांचे वडील मोठे इतिहासकार आणि अभ्यासक होते त्यांची विपुल प्रमाणात ग्रंथ संपदा प्रशीध्द आहे त्यांनी व्यंगचित्रकार म्हणुन कामाला सुरुवात केली बाळासाहेब ठाकरे हे सर्व स्तरावरील मानसापर्यंत विचारांवर सुधारणावादी धोरणांना आणि रोखठोक मत मांडणारे चालते बोलते व्यासपीठ ते आज नसले तरी विचार मात्र आहेत सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी 1960 मध्ये सामना हे शिवसेनेचं मुखपत्र म्हणून नावारूपाला आणलं पुढे 1966 मध्ये त्यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली पक्षाचे शिवसेना हे नाव वडील प्रबोधनकार ठाकरे ह्यांनी सुचविले शि म्हणजे शिस्तबद्ध व म्हणजे वतनदार से म्हणजे सेवक ना म्हणजे नामदार अशी शब्दाची फोड करून अर्थ नोंदणी केली जाते 1978 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांनी पहिल्यांदा यश मिळाले तेव्हा शिवसेना नेते मनोहर जोशी हे महापौर झाले होते पुढे 1995 मध्ये शिवसेना आणि भाजप ह्या युतीला महाराष्ट्र विधानमंडळात विधानसभा निवडणुकीत यश आले मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे ह्यांना उपमुख्यमंत्री पद दिले शिवसेना नेते नलवाडे विधानसभा अध्यक्ष झाले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी अनेक जनहिताची कामं केली बाळासाहेब ठाकरे यांचे 17 नोव्हेंबर 2012 हृदयविकाराच्या झटक्याने मोतोश्री निवासस्थानी निधन झाले त्यांच्या विचारांचा आदर करत शिवसैनिक लढत आहेत नंतर 2014 मध्ये परत विघमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोदी लाटेवर महाराष्ट्रात युतीला विधानसभा निवडणुकीत यश मिळाले भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पुढे 2019 च्या निवडणूकीत युतीला मोठ्या प्रमाणात यश मिळाले परंतु दोन्ही पक्षात अडीच वर्ष कालावधी मुख्यमंत्री पदावरून पेच निर्माण झाला आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस हे तिंन्ही पक्ष महाविकास आघाडी घेत एकत्र आले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आज शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवून काम करतात बाळासाहेबांच्या स्मृतिला विनम्र अभिवादन

सुभाष नारायण कामडी
संशोधक
मो नं 9579543308

लेखकाबद्दल

सुभाष कामडी

एक टिप्पणी द्या