आडसुरेगांव येथे विकास कामांचे उदघाटन
येवला (नारायण गुंजाळ) :- येवला तालुक्यातील आडसुरेगाव येथे मूलभूत विकास योजने अंतर्गत सभामंडप च्या कामाचे भूमिपूजन पूर्व भागाचे युवानेते मा.श्री. नंदू आबा सोमासे यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आडसुरेगावचे सरपंच रामकृष्ण चव्हाण हे होते. यावेळी उपसरपंच प्रकाशभाऊ कोकाटे, गोरखनाथ चव्हाण, सोपानराव गायकवाड, आप्पासाहेब चव्हाण, भास्करआप्पा चव्हाण, रामेश्वर चव्हाण, आजिनाथ चव्हाण, विकासभाऊ चव्हाण, किशोर कोकाटे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

