[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या हेल्थ

दुगाव प्रीमियर लीग – सिझन – टु चा शानदार समारोप

मान्यवरांनी दिली बक्षिसे -सहा संघांचा सहभाग

चांदवड तालुक्यातील दुगाव येथील दुग्धेश्वर मैदानात भव्य टेनिस बाँल क्रिकेट स्पर्धा युवकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाल्यात. दुगाव प्रीमियर लीग – सिझन – टु या नावाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तो ईगल्स संघाने, द्वितीय क्रमांक रुद्रा इलेव्हन तर तूतीय क्रमांक संग्राम सुपरकिंग यांनी पटकाविला. त्यांना बक्षिसे देण्यात आली. प्रथम क्रमांकाचे बक्षीस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी २१००० रुपये, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथअण्णा आहेर यांनी १५००० रूपये तर तूतीय क्रमांकाचे बक्षीस समता परिषदेचे जिल्हा सरचिटणीस सतिष दिनकर सोनवणे यांनी ११००० रुपये दिले.
उत्तेजनार्थ बक्षिसे श्रावणी वारिर्यस,शंभो इलेव्हन, किंग्ज इलेव्हन या संघांना देण्यात आली.
बेस्ट बँट्समन सचिन माळी, बेस्ट बाँलर्स भाऊसाहेब, मँन आँफ दि मँच ही तिन्ही बक्षिसे पवार अमूर्ततुल्यचे दुगाव शाखेचे संचालक सिकंदर अब्दुल शेख यांनी दिले.
मँन आँफ दि सिरिज एकनाथ पवार यांना देण्यात आली . मँन आँफ द सिरिज चे बक्षीस अन्सार शेख यांनी दिले.
खेळासाठी मैदान संजय पुंडलिक सोनवणे व साहेबराव बाळासाहेब सोनवणे यांनी उपलब्ध करून दिले.माजी पंचायत समिती सभापती यु.के.आहेर सरपंच आरतीताई सोनवणे यांचे सहकार्य लाभले.
समारोप सभारंभासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक रघुनाथ आहेर , माजी पंचायत समिती सभापती यु.के.आहेर, हरसूलचे माजी सरपंच शरद आहेर , दुगावच्या सरपंच आरतीताई सोनवणे, उपसरपंच दिगंबर सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य भीमाबाई गायकवाड, मंगला सोनवणे, वैशाली सोनवणे, गौतम एळिंजे यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक वसंतशेठ सोनवणे, प्रकाश सोनवणे, पि.के.सर,दिलिप सर,दिलिपशेठ सोनवणे, चेतन सोनवणे, जगदीश सोनवणे, विनायक सोनवणे, सुभाष टेलर, तंटामुक्त अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे,सोसायटी चेअरमन अशोक सोनवणे, संतोष जामदार,पोलीस पाटील रवींद्र सोनवणे, अरुणशेठ सोनवणे, मज्जीद शेख,एकनाथ सोनवणे,रंगनाथ ताऊबा, तुळशीराम अप्पा, लक्ष्मण सोनवणे, नाना गोडबोले, संदिप सोनवणे, प्रविण आहेर, दशरथ गायकवाड, चांगदेव गुंजाळ, रामदास गांगुर्डे, गोरख अहिरे आदी उपस्थित होते

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या