दुगाव ग्रामपंचायत विस्तारीकरण कामांचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन
चांदवड तालुक्यातील दुगाव येथील ग्रामपंचायतीच्या विस्तारीकरण या कामांचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा दुगाव गटाचे जि.प. सदस्य डॉ. सयाजीराव गायकवाड यांच्या हस्ते नुकतेच दुगाव येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच आरतीताई सोनवणे ह्या होत्या.
यावेळी कोरोनाकाळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल आशा सेविका, अंगणवाडी सेविका, उपकेंद्रातील डॉक्टर शिंदे, सिस्टर अष्टेकर, कांबळे, खाजगी डॉक्टर सुनील सोनवणे आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायत समितीचे माजी उपसभापती यु.के.आहेर यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चांदवडचे पोलीस निरीक्षक समिर बारवकर, गटविकास अधिकारी महेश पाटील,विस्तार अधिकारी के.एम. लोहार, शाखा अभियंता गरूड, देवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक रघुनाथ आहेर , हरसूलचे माजी सरपंच शरद आहेर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमास सरपंच आरतीताई सोनवणे, उपसरपंच दिगंबर सोनवणे,ग्रामसेवक सी. डी. ठाकरे ग्रामपंचायत सदस्य भीमाबाई गायकवाड, मंगला सोनवणे, वैशाली सोनवणे, गौतम एळिंजे यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक वसंतशेठ सोनवणे, प्रकाश सोनवणे, पि.के.सर,दिलिप सर,दिलिपशेठ सोनवणे, चेतन सोनवणे, जगदीश सोनवणे, विनायक सोनवणे, सुभाष टेलर, तंटामुक्त अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे,सोसायटी चेअरमन अशोक सोनवणे, संतोष जामदार,पोलीस पाटील रवींद्र सोनवणे, अरुणशेठ सोनवणे, मज्जीद शेख,एकनाथ सोनवणे,रंगनाथ ताऊबा, तुळशीराम अप्पा, लक्ष्मण सोनवणे, नाना गोडबोले, संदिप सोनवणे, प्रविण आहेर, दशरथ गायकवाड, चांगदेव गुंजाळ, रामदास गांगुर्डे, गोरख अहिरे आदी उपस्थित होते

