चांदवड :-आजादी का अमृतमहोत्सव, भारत स्वतंत्रता की ७५ वर्ष के उपलक्ष मे रोग मुक्त भारत व फिट इंडिया अभियान अंतर्गत आयुष मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान यांच्या सहकार्याने इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन आयोजित व योग विद्या धाम, चांदवड, योगदर्शन फाउंडेशन चांदवड व अखिल भारतीय शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने व श्री. स्वामी समर्थ केंद्र, चांदवड यांच्या सहकार्याने चौथा राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिवस निमित्ताने ‘आरोग्यासाठी प्राकृतिक चिकित्सा व निसर्गोपचार’ कार्यक्रमाचे आयोजन आयएनओ महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष स्वामी शिवानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. स्वामी समर्थ केंद्र, चांदवड येथे करण्यात आले होते
सदर कार्यक्रमात पंचमहाभौतिक मानवी शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी प्राकृतिक चिकित्सा व योग व निसर्गोपचार पद्धती आणि त्याचे जीवनात अनन्यसाधारण महत्व या विषयावर योग प्रशिक्षक व इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष प्रा. राहुल (अंबादास) बी.येवला यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले.
प्रा. राहुल येवला यांनी इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन मार्फत नाशिक जिल्ह्यासह चांदवड तालुक्यात १८ नोव्हेंबर २०२१ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत विविध ठिकाणी प्राकृतिक चिकित्सा व निसर्गोपचार शिबिरांचे आयोजन केले जाणार असून नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी श्री.स्वामी समर्थ केंद्राचे अध्यक्ष बाळासाहेब शेळके, होते तसेच विश्वस्त देवदत्त बच्छाव, विमल शेळके, अथर्व येवला, गणूकाका सोनवणे, अमोल बिरारी, मनोहर सोनवणे,अक्षय मते, योगेश परदेशी, भगवान क्षत्रिय, सुवर्णा सोनवणे, दिलीप खंदारे, रूपाली दुसाने इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्राकृतिक चिकित्सा शिबिर कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. राहुल बी. येवला व उपस्थित नागरिक
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनंत बिरादर, समन्वयक डॉ. सुशांत पिसे, महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. कुमुद जोशी कार्यकारी अध्यक्ष स्वामी शिवानंद महाराज उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉ. शुभांगी रत्नपारखी, जॉईंट सेक्रेटरी डॉ. तस्मिना शेख, मीडिया प्रभारी डॉ. योगेश सदगीर प्रा. यु. के. अहिरे आदींनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
प्रा. राहुल बी. येवला
(योग प्रशिक्षक व केंद्रप्रमुख)
योग विद्या धाम, चांदवड
अध्यक्ष:- योगदर्शन फाउंडेशन, चांदवड
उपाध्यक्ष व राष्ट्रीय सचिव:-
अखिल भारतीय योगशिक्षक महासंघ
उपाध्यक्ष इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन, नाशिक
9370382942 / 7385216951
rahulyeola1982@gmail.com

