_तेरा पैकी बारा जागांवर मताधिक्याने विजय मिळवत सत्ता काबीज_
निफाड ( प्रतिनिधी ): – आर्थिकदुष्टया सक्षम असणाऱ्या चितेगाव ( ता . निफाड ) येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चुरशीच्या लढतीत ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज व शिवभक्त नारायन महाराज याचे कृपा आर्शिवादाने शेतकरी विकास पैनल ला बहुमत मिळाले
चितेगांव ता निफाड येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चुरशीच्या लढतीत रोहीदास कदम बबन नाना कदम बाजीराव अप्पा कदम नंदलाल दळवी सुनिल लंवाड बाळासाहेब लंवाड रंगनाथ कदम या सर्वाच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास पॅनलने १३ पैकी १२ जागांवर विजय मिळवत सत्ता काबिज केली . आगामी पिंपळगाव बसवंत बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात अतिशय महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या चितेगाव सोसायटीसाठी रविवारी ( ता . १ ९ ) मतदान झाले . त्यानंतर लगेचच निवडणूक निर्णय अधिकारी श्री . काकड व कर्मचाऱ्यांनी मतमोजणी केली .
शेतकरी विकास पॅनल व कृषी
विकास पॅनल या दोन गटात सरळ लढत होती . एकूण १३ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात होते . या चुरशीच्या लढतीत शेतकरी विकास पॅनलने एकतर्फी विजय मिळवत १३ पैकी १२ जागा जिंकत सत्ता काबीज केली . प्रतिस्पर्धी कृषी विकास पॅनलला केवळ – एका जागेवर समाधान मानावे लागले . सर्वसाधारण गटातून श्री . अनिल काशिनाथ कदम यांच्यासह राजाराम कदम , नामदेव
, ठाणगे , गणपत दाभाडे , कचरू लवांड , अशोक शेलार , सुभाष शेलार , शरद शेलार , इतर मागास प्रवर्ग गटातून किरण गाडे व स्त्री राखीव गटातून सुचिता दळवी , लता पिंगळ , अनुसूचित जाती जमाती गटातून बाळू बर्वे आणि भटक्या विमुक्त जाती – जमाती वि . मा . प्रवर्गातून राजाराम फटांगडे विजयी झाले .
निकाल जाहीर होताच शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी . जल्लोष केला . विविध मान्यवरांनी यावेळी विजयी उमेद्वारांचे व पँनलच्या नेत्यांचे अभिनंदनासह सत्कार केला.

