[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

पानिपत ची शौर्यज्योत २४ ला येवल्यात

यांनी लिहिलेले नारायण गुंजाळ

 

शौर्यज्योत सांगणार ‘पानिपत’ची गाथा

येवला येथे पार पडली नियोजन बैठक

येवला (नारायण गुंजाळ ):- पानिपत येथील रणसंग्रामात आपल्या प्राणाची आहुति देणार्या वीर मराठ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘सशक्त भारत’ परिवाराच्या माध्यमातुन तसेच डॉ.संदिप महिंद गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली ६ जानेवारी ते १४ जानेवारी दरम्यान दुचाकी मोहिमेचे आयोजन केले आहे.परतीच्या मार्गावरील १६७० किलोमीटरचे अंतर पानिपत येथे प्रज्वलीत केलेली मशाल घेऊन १३ दिवसांत अंतर पार करत पुणे येथे पोहचणार आहे.२६ जानेवारी रोजी ही पुणे येथे पोहचुन मशाल नियोजीत जागेवर कायम स्वरुपी प्रज्वलीत करण्यात येणार आहे.
मशाल मोहिम परतीच्या वाटेवर असताना २४ जानेवारी रोजी येवला येथे आगमन होणार आहे.या मोहिमेच्या स्वागता साठी आज सर्व शिवशंभु भक्तांच्या तसेच सशक्त भारत परिवाराच्या वतीने येवला येथे नियोजन बैठकीच आयोजन करण्यात आल होत.या मोहिमेत जास्तीत जास्त येवले करांनी सहभागी व्हाव अस आवाहन जेष्ठ नेते माणिकरावजी शिंदे यांनी केले.या बैठकीस धीरज परदेशी,बापुसाहेब गायकवाड,आनंद शिंदे,शाहु शिंदे,विलास ढोमसे,बापुसाहेब शेलार,नारायण गुंजाळ,दिपक देशमुख,प्रविण निकम,सुनिल सस्कर ,संदिप बर्शिले,संजय बोळीज ,रामभाऊ ढोमसे, रविंद्र पगार, सागर शेलार तसेच शिवभारत आख्यान समिती सर्व शिलेदार उपस्थित होते‌.

येवला तालुक्यातुन मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणार्यांनी www.sashaktabharat.com या वेबसाईटला भेट द्यावी किंवा संदिप बर्शिले ८२०८०९८३१८ यांना संपर्क करावा.

लेखकाबद्दल

नारायण गुंजाळ

एक टिप्पणी द्या