नाशिक;- अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाचे पहिले दोन दिवसीय अधिवेशन ‘महायोगोत्सव’ वेरूळ (औरंगाबाद) येथे २५,२६ डिसेंबर ला महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ मनोज निलपवार राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष राहुल (अंबादास) बी. येवला महासचिव कु.हर्षिता बम्बुरे ,केंद्रीय समिती उपाध्यक्ष डॉ निलेश वानखेडे, मनोज नाईक, माधुरी परमार,विनायक बारापत्रे, नियोजन समिती अध्यक्ष गंगाप्रसाद खरात,सचिव कृनाल प्रशासकीय अधिकारी दिनेश भुतेकर,अंजली देशपांडे, अमित मिश्रा,अमोल बिरारे इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या कुशल नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहाने संपन्न झाले.
जगतगुरु संत जनार्धन स्वामी (मौनगिरीजी महाराज) यांच्या वेरूळ येथील भव्य आश्रमात त्यांच्याच प्रेरणेने व आशीर्वादाने उत्तराधिकारी महामंडलेश्वर शांतिगिरीजी महाराज यांच्या हस्ते या महायोगोत्सवाची सुरुवात झाली.योगाचे मुळउद्गाता महादेवाच्या देशातील एकुण बारा ज्योतिर्लिंगातील घृष्णेश्वराच्या सानिध्यात अधिवेशन पार पडल्यामुळे योगशिक्षकांचा उत्साह द्विगुणीत झाला.
अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ ही राष्ट्रीय पातळीवर योगाचे कार्य वाढविणारी ,योगशिक्षकांचे प्रश्न सोडविणारी व त्यांना रोजगार व समाजात सन्मान मिळवुन देणारी पहिली संघटना आहे.त्यामुळे या विषयावर संमेलनात विचारविमर्ष करून पुढील दिशा ठरविण्यात आली व तसा ठराव करण्यात आला.या संमेलनात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते समरणिकेचे व महासंघा तर्फे योगावर रिसर्च करून छापलेले ‘योगानुभुती’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
दोन दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक चे योग शिक्षण संचालक डॉ
जयदीप निकम यांचे ‘योगशिक्षण व संशोधन क्षेत्रातिल संधी’ या विषयावर व्याख्यान, डॉ निलेश वानखेडे नागपूर यांचे ‘आयुर्वेदिक वनस्पती’ मार्गदर्शन, मनोज नाईक पुसद यांचे मानवजीवनातील योगाचे महत्त्व, कृनाल महाजन जळगांव यांचे सप्तचक्र एक आत्मिक अनुभुती, डॉ राजेश भोंडे अकोला यांचे पंचवृत्ती व पंचकलेश ,आश्रम प्रमुख रामानंदजी महाराज ‘आजका युवक कलके भारत का भविष्य’, राष्ट्रीय सचिव राहुल येवला चांदवड यांचे श्वसन व संसर्गजन्य विकारांवर जलनेती व ओंकार साधनेचा परिणाम इत्यादी अनेक विषयांवर अनेक योगतज्ञ विद्वानांनी भाषणे दिली व मार्गदर्शन केले.

अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशन महायोगोत्सवाचे दीप प्रज्वलन करताना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. मनोज निलपवार, राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राहुल (अंबादास) येवला केंद्रीय समिती उपाध्यक्ष डॉ. निलेश वानखेडे, मनोज नाईक, माधुरी परमार, महासचिव कु. हर्षिता बम्बूरे, मीडिया प्रभारी कृणाल महाजन, महामंडलेश्वर प.पु. १००८ शांतिगिरी महाराज, आश्रम प्रमुख रामानंदजी महाराज, प्रशासकीय अधिकारी दिनेश भुतेकर, अंजली देशपांडे, योगासन फेडरेशनचे सचिव सुरेश गांधी आदी मान्यवर
तसेच चांदवड जि. नाशिक येथील राहुल येवला व डॉ तस्मिना शेख यांनी आय.एन.ओ. अंतर्गत प्राकृतिक चिकित्सा दिवस निमित्त महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष १००८ शिवानंदन महाराज यांच्या सहकार्याने शितकर्म,व्युत्कर्म क्रिया क्रियांचे प्रात्यक्षिक दिले व जलनेती पात्रांचे मोफत वितरण सर्वांना केले.
निरोप समारंभ डॉ मनोज निलपवार यांच्या अध्यक्षतेखाली झाला.तसेच रामानंद महाराज यांनी मार्गदर्शन करून योगी हा निस्वार्थी असल्याने तोच देशाचे नेतृत्व करु शकतो व देश प्रगतीपथावर नेऊ शकतो असे प्रतिपादन केले.अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हे संमेलन संपन्न झाले.

