[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

प्रा. आरती रावसाहेब शिंदे यांना मराठी विषयात सुवर्णपदक

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

 

जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय निमोण येथील प्राध्यापिका श्रीमती. आरती रावसाहेब शिंदे यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांचे मराठी विषयात सुवर्णपदक मिळाले असुन त्या चांदवड येथील लोढा सुराणा महाविद्यालयातून एम. ए. मराठी दुसऱ्या वर्षासाठी परीक्षेस प्रविष्ट झाल्या होत्या. त्यात त्यांनी विद्यापीठात मराठी विषयात प्रथम क्रमांक मिळवत विद्यापीठाचे सुवर्णपदक पटकवून चांदवड तालुकयास या माध्यमातून पहिल्यांदा मान प्राप्त करून दिला आहे त्या सोनी सांगवी येथील रहिवाशी आहे. त्याच बरोबर उच्च माध्यमिक विभागातील प्राध्यापक श्री.दीपक ठाकरे सर व श्रीमती. मुमताज इनामदार मॅडम हे देखील एम. ए. दुसऱ्या वर्षात विशेष प्राविन्यासह उत्तीर्ण झाले. त्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य श्री. सूर्यवंशी पी. व्ही व सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचा सत्कार केला.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

टिप्पणी

एक टिप्पणी द्या