[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

दरेगाव येथे ग्रामपंचायत, सोसायटी, माध्यमिक व प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

 

चांदवड तालुक्यातील दरेगाव येथे ग्रामपंचायत व सोसायटीच्या शासकीय कार्यालयात व माध्यमिक व प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन कोरोना नियमांचे पालन करून उत्साहात संपन्न झाला.

दरेगाव ग्रामपंचायत
दरेगाव ग्रामपंचायतचे ध्वजारोहण भारतीय लष्करातील जवान संदिप विजय देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर ध्वजपुजन
महारू नामदेव गांगुर्डे, दामू बाबुराव देवरे व रामदास सखाराम पगार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत सरपंच अमोल अशोक देवरे,उपसरपंच नथु देवराम देवरे,माजी सैनिक भिला संपत पगार, माजी सैनिक रमण राघो गांगुर्डे, पोलीस पाटील सोमनाथ बबन गांगुर्डे, ग्रामपंचायत कर्मचारी उत्तम पुंजाराम खरात, संगणक परिचालक गोकुळ चिमण देवरे,अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.निकम सर यांनी प्रास्ताविक केले.

दरेगाव विविध कार्यकारी सोसायटी

दरेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सोसायटीचे ध्वजारोहण माजी सरपंच _म्हसु पा. सुखदेव पगार_ यांच्या हस्ते करण्यात आले. तर ध्वजपुजन माजी सरपंच पुंजाराम नारायण गांगुर्डे, बाबाजी रामभाऊ देवरे,बबन फुला गांगुर्डे, सुभाष नारायण पगार, नागेश वाळुबा मगर यांनी केले. यावेळी _सोसायटी चेअरमन विक्रम कारभारी देवरे,संचालक माधवराव एकनाथ देवरे, संचालक बारकु रमण देवरे,माजी चेअरमन भाऊसाहेब सुखदेव देवरे,भाऊसाहेब सुर्यभान गांगुर्डे, दत्तु भास्कर पगार, विनोद सखाराम गांगुर्डे, संदीप विश्वनाथ बोरसे,अनिल श्नावण गव्हाणे, कोतवाल रामदास पिंपळे, सोसायटी लिपिक महेंद्र गांगुर्डे आदी उपस्थित होते._

विकास माध्यमिक विद्यालय

विकास माध्यमिक विद्यालयाचे ध्वजारोहण संजय दामु जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पुंजाराम नारायण गांगुर्डे,म्हसु सुखदेव पगार, विक्रम कारभारी देवरे,सोमनाथ बबन गांगुर्डे, अनिल श्रावण गव्हाणे, भाऊसाहेब सुखदेव देवरे,दतु भास्कर पगार,भाऊसाहेब सुर्यभान गांगुर्डे, बाबाजी रामभाऊ देवरे,विनोद सखाराम गांगुर्डे,भाऊसाहेब रतन अहिरे यांच्यासह ग्रामस्थ व विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

प्राथमिक शाळा दरेगाव

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समितिचे उपाध्यक्ष नवनाथ बाळु पगार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विक्रम गांगुर्डे, सरपंच अमोल अशोक देवरे, उपसरपंच नथु देवराम देवरे, सोसायटी चेअरमन विक्रम कारभारी देवरे,माजी सरपंच पुंजाराम नारायण गांगुर्डे, माजी सरपंच म्हसु सुखदेव पगार,संजय दामु जाधव, माजी अध्यक्ष भाऊसाहेब सूर्यभान गांगुर्डे, माजी चेअरमन भाऊसाहेब सुखदेव देवरे,मेजर संदीप विजय देवरे,माजी सैनिक भिला संपत पगार, माजी सैनिक रमण राघो गांगुर्डे, रामदास सखाराम पगार , माधवराव एकनाथ देवरे,विनोद सखाराम गांगुर्डे,सोमनाथ बबन गांगुर्डे,धर्मा निव्रुत्ती गांगुर्डे,बारकु रमण देवरे,सुभाष नारायण पगार,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेच्या विद्याथ्र्यांनी उपस्थितांसह ध्वजगीत व राष्ट्रगित म्हंटले. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या