चांदवड: दिनांक 26/01/2022 रोजी ग्रामपंचायत दुगाव येथे ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य मा. श्री प्रकाश सुकदेव सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट शालेय कामकाजात मदत केल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री जगदीश किसनराव सोनवणे यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे या काळात आदर्श मुख्याध्यापक म्हणून श्री दिलीप लक्ष्मण सोनवणे, श्री धोंडीराम त्रंबक रौंदळे आदर्श शिक्षक व श्रीमती जयश्री मधुकर सोनवणे आदर्श शिक्षिका म्हणून गौरविण्यात आले 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुगाव येथील ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा मा. सौ पूनम प्रकाश सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. सौ. भारती दिलीप सोनवणे यांनी मुलींच्या शौचालय दुरुस्तीसाठी 5001 रुपये देणगी दिली. त्याचप्रमाणे श्री प्रकाश सुकदेव सोनवणे यांनी 1100 रुपये देणगी दिली. या वेळी मुख्याध्यापिका सौ ततार मॅडम व सर्व शिक्षक उपस्थित होते. त्याचप्रमाणे शालेय समितीच्या अध्यक्षा उपाध्यक्ष व सदस्य, डॉ. सुनील सोनवणे, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स व देशप्रेमी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. यु. के. आहेर व धोंडीराम रौंदळे सर यांनी केले. आभार श्री गांगुर्डे केदू तुकाराम सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

