माध्यमिक विद्यालय शिंगवे तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथे आज इयत्ता दहावीच्या 35 व्या बॅच चा निरोप समारंभ संपन्न झाला .
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती चांदवड उपसभापती श्री शिवाजीराव सोनवणे सर, तसेच शिंगवे गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ नीता पाटील ,संस्था सचिव श्री सुखदेव नाना बोरसे, संस्थेचे सभापती व माजी सरपंच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त श्री पुनमचंदजी खताळ, संचालक व शिंगवे येथील माजी सरपंच श्री तुकाराम तात्या खताळ आणि दुगाव येथील कलाशिक्षक आणि संस्थेचे संचालक श्री पी एस आहिरे सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी सुरुवातीला प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील गीत मं चाच्या मुलींनी मान्यवरांचे स्वागत केले. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री पवार सर यांनी सुरवातीला प्रास्ताविक मध्ये विद्यालयाची आज पर्यंत ची माहिती आलेल्या मान्यवरांना व विद्यार्थ्यांना सांगितली. यानंतर इयत्ता दहावीच्या कुमारी समीक्षा ठाकरे वैशाली झाल्टे प्रतिभा पवार या विद्यार्थिनींनी मनोगतातून आपले विचार मांडले त्याचबरोबर इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक श्री खताळ सर, श्री गायकवाड सर यांनी आपले मनोगत तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रमुख अतिथी श्री शिवाजीराव सोनवणे सर पंचायत समिती उपसभापती चांदवड यांनी माध्यमिक विद्यालय शिंगवे ला एक पिण्याच्या पाण्याची सिमेंटची टाकी बांधून दिली. याप्रसंगी विद्यालयाने त्यांचा सत्कार केला. तसेच प्रमुख अतिथी मध्ये डॉक्टर अंकिता संजय खताळ याही उपस्थित होत्या. त्यांनीही विद्यार्थ्यांना संबोधित करून मार्गदर्शन केले व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. श्री अहिरे सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना संबोधित करताना गावाशी असलेलं नातं आणि जोडलेली नाळ कधी तोडू नका, शाळेच्या ऋणात राहा असे मार्गदर्शन केले व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आवारे सर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले, शुभेच्छा दिल्या तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित असा सत्कार केला. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयास निरोप समारंभा निमित्त काही भेटवस्तू दिल्या. त्या मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक यांच्याकडे त्यांनी सुपूर्त केल्या. तसेच कोरोना काळामध्ये विद्यालयातील शिक्षकांनी केलेल्या कामात बद्दल पंचायत समिती उपसभापती सोनवणे सरांनी विद्यालयातील शिक्षकांचा कोविड योद्धा असे सर्टिफिकेट देऊन सन्मान केला.
सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी मयुरी संतोष खताळ या विद्यार्थ्यांनी केले व शेवटी श्री खताळ सर यांनी आलेल्या मान्यवरांचे व सर्वांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना अल्पोपहार दिल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

