चांदवड तालुक्यातील काँग्रेस काँग्रेस पक्षातर्फे चांदवड येथे कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक संपन्न झाली. यावेळी ‘ऑनलाइन सभासद नोंदणी’ करण्यास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी हेमंत ओगले यांनी ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी फक्त काँग्रेस पक्ष हाच एकमेव पर्याय आहे, काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांना कायमच मदत केली असून, सध्या भाजपच्या काळात शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकरी हितासाठी तरुणांनी काँग्रेस पक्षामध्ये सामील व्हावे असे हेमंत ओगले यांनी आवाहन केले.’
चांदवड देवळा मतदार संघातील युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून निवडून आलेले दीपांशू जाधव यांचा सत्कार यावेळी हेमंत ओगले यांच्या हस्ते करण्यात आला. ‘आगामी निवडणुका जिल्हा परिषद, पंचायत समिती, व नगरपरिषद अशा ठिकाणी तरुणांना संधी दिली जाईल, जनतेसमोर नवीन चेहरे देण्याचा प्रयत्न करु पक्षासाठी काम करणारे तरुण व निष्ठावंत कार्यकर्ते यांना योग्य न्याय देऊ.’ असे प्रतिपादन यावेळी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी केले. 
‘तालुक्यातील जनतेच्या कामासाठी व उपेक्षितांचे प्रश्न सोडवण्यासाठी युवक काँग्रेसने तालुक्याचा दौरा करावा’ असे आवाहन तालुकाध्यक्ष संजय जाधव यांनी केले. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस शिवाजी कासव यांनी केले, तर आभार भोयेगाव येथील युवक काँग्रेसचे गटप्रमुख सागर निकम यांनी आभार मानले. या प्रसंगी भीमराव जेजुरे, राजूभाऊ गिडगे, उत्तमराव ठोंबरे, पंकज दखणे, बापू शिंदे, भीमराव निरभवणे, ज्ञानेश्वर जाधव, पप्पू कोतवाल, आण्णा कोतवाल, कांतीलाल बाफना, किरण ठाकरे, अक्षय माकुणे पाटील, आकाश बडोदे यांच्यासह अनेक कॉंग्रेस व युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

