[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

दुगांव ता.चांदवड येथे श्री रामनवमी व क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले जयंती उत्साहात साजरी

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

श्री रामनवमी निमीत्त दुगांव येथे दि.१० एप्रिल रोजी श्री रामनवमी व क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती उत्सव समिती तसेच भजनी मंडळ दुगांव ग्रामस्थांच्या सहकार्याने रामनवमी उत्सव श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अतिशय जल्लोषात साजरा केली. प्रभु रामचंद्रांसाठी पाळणा/ अंगाई व भजन गाऊन आनंदोत्सव साजरा केला. गावातील तरुण मित्र मंडळांनी संपुर्ण गावात भगव्या पताका लाऊन गाव भगवेमय केले. तसेच फटाक्यांची आतषबाजी व प्रभु रामचंद्रांच्या रथयात्रेची संपुर्ण गावातुन मिरवणुक काढली.
तसेच ११एप्रिल रोजी महात्मा फुले जयंती निमित्त दुगांव चौफुलीवर महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतीमेचे पुजन श्री कचरु नारायण सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्री रामनवमी व क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले उत्सव समितीचे सर्व सभासद तसेच पंचक्रोशीतील फुलेप्रेमी व दुगांवकर ग्रामस्थ उपस्थित होते. सायं.६ वा.रथयात्रा मिरवणुक ‌काढण्यात आली. सर्व समाजबांधवांच्या व जयंती उत्सव समितीच्या सहकार्याने कार्यक्रम निर्विघ्न पार पडला. कार्यक्रमास चांदवड पोलिस स्टेशन व ग्रामस्थ व तरुण मित्र मंडळांचे अनमोल सहकार्य लाभले.
महात्मा फुले चौकात मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या