गावविकासासाठी व राजकीय व व्यक्तीगत हेवेदावे मिटावेत यासाठी सोसायटीची निवडणूक बिनविरोध
कातरवाडी गाव .चांदवड तालुक्यातील पुर्व भागातील नांदगाव तालुका व येवला तालुक्यातील सिमेवरील मनमाड शहराजवळील गाव. प्रसिद्ध मनमैद डोंगर(शेंडींचा डोंगर ) म्हणून प्रख्यात. गाव लहान असले तरी या ना त्या कारणाने सतत चर्चेत असणारे व राजकीयदूष्ट्या संवेदनशील गाव म्हणूनही परिचित. येथे ग्रामपंचायत असो किंवा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी या गावातील दोन सत्ताकेंद्रे ताब्यात घेण्यासाठी प्रचंड संघर्ष पहावयास मिळतो. तसेच सातत्याने वाद – विवादही ओघाने आलेच.त्यामुळे गावात अशांतता असते. याआधीच्या निवडणुकांमध्ये याची प्रचिती आली आहे. सध्या सर्वत्र गावपातळीवरील सहकारी सोसायटींच्या निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. कातरवाडी येथीलही निवडणूक घोषित झाली. आता पुन्हा एकदा संघर्ष पहावयास मिळेल असे चित्र असतांना यावेळी मात्र वेगळेच चित्र दिसले. गावाचा विकास व्हावा , गावात शांतता नांदावी ,सर्वानी एकत्र येऊन ग्रामविकासाचे काम उभे राहावे म्हणून परंपरागत दोन पँनल पैकी एका पँनलने निवडणुकीच्या रिंगणातून दोन पावले माघे येत माघार घेतली व एका पँनलला बिनविरोध निवडून दिले. यामुळे गावात सामाजिक, राजकीय, व्यक्तीगत हेवेदावे मिटावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे तर बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांनी गावास दिलेला शब्द पाळावा अशी अपेक्षा माघार घेतलेल्या उमेदवारांनी व्यक्त केली आहे तर बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांनी आपण ग्रामविकासासाठी गावकऱ्यांना दिलेल्या शब्दास बांधील राहु ,असे आश्वासन दिलं आहे.

कातरवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी बिनविरोध झालेली नवनिर्वाचित संचालक मंडळ असे…
कातरवाडी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या . कातरवाडी , ता . चांदवड , जि . नाशिक व्यवस्थापन समितीची निवडणुक सन २०२२-२३ ते सन २०२६-२७ महाराष्ट्र सहकारी संस्था ( समितीची निवडणुक ) बिनविरोध निवडुन आलेले आहेत . कारण त्या – त्या जागेसाठी ते एकच उमेदवार होते . ओ.बी.सी गटात झाल्टे गिताताई रावसाहेब यांची बिनविरोध निवड झाली आहे . गिताताई झाल्टे ह्या कातरवाडी येथील विद्यमान सरपंच असून भारतीय जनता पक्षाच्या चांदवड तालुका महिला आघाडीच्या अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत आहे.
तर कर्जदार खातेदार प्रतिनिधी गटात झाल्टे मच्छिंद्र केदु , झाल्टे गोकुळ रखमा , झाल्टे बाळासाहेब लक्ष्मण, साठे अर्जुन तात्याबा ,गुंजाळ विष्णु पंढरीनाथ, गुंजाळ कौतिक फकिरा, झाल्टे बाळु लक्ष्मण , झाल्टे अर्जुन सखाराम, अनुसूचित जाती जमाती गटात संसारे रामदास किसन , झाल्टे मंदाबाई पोपट , सोनवणे सविता अनिल यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे सहकार अधिकारी ( द्वि.श्रे . ) चांदवडचे नितिन पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.

