मनमाड:- सुपर मार्केटमध्ये (मॉल) सिलबंद बाटलीतून वाईन विक्री करण्यास परवानगी देण्यासंदर्भातील वरील जाहिरात कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.मात्र यासाठी नागरिकांनी विरोध करण्याची गरज असल्याचे आवाहन जेष्ठ उद्योगपती अजित सुराणा यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
मॉलमधुन मधुन खुलेआम वाइन विक्री करणे म्हणजे हे येणाऱ्या तरुण पीढिसाठी धोकादायक आहे.त्यामुळे आपण सर्वांनी या गोष्टीला कडाडून विरोध केला पाहिजे.यासाठी सर्वांनी वरील नोटीस व्यवस्थित वाचून त्याचे अवलोकन करून सर्वांनी जास्तीत-जास्त प्रमाणात विरोध नोंदवला पाहिजे. जेणेकरून शासनाला हा निर्णय मागे घ्यावा लागेल.
वाईन संदर्भातील हा निर्णय अत्यंत घातक असून याला अधिकाधिक प्रमाणात विरोध होणे गरजेचे आहे.त्यासाठी अधिकाधिक प्रमाणात हरकती/विरोध नोंदवावा.असेही त्यांनी म्हटले असून इतर व्यक्ती विरोध नोंदतील या भरवशावर राहू नये. प्रत्येकाने आपली वैयक्तिक जबाबदारी समजून मेलद्वारे अथवा पोस्टाने हरकती/विरोध नोंदवावा.
त्याचप्रमाणे हा मजकूर व वरील जाहिरात जास्तीत-जास्त सोशल मिडियाद्वारे शेअर करावा.जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचून या घातक निर्णयाविरुद्ध अधिकाधिक विरोध नोंदवला जाईल.
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री बाबत शासनाने जो घातक निर्णय घेतला आहे त्या निर्णयाविरुद्ध सामान्य जनतेत जागृती होऊन जनतेमार्फत अधिकाधिक हरकतींच्या माध्यमातून विरोध करण्याची गरज असल्याचे मत ही सुराणा यांनी व्यक्त केले आहे.

