अष्टपैलू व्यक्तिमत्त्व : ए टी पवार
शेतकऱ्यांचे कैवारी पाणीदार नेते आदिवासी भागातील बांधवांच्या विकासासाठी झटलेले ए टी पवार यांची आज पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याबद्दल थोडक्यात धांडोळा …
नाव : अर्जुन तुळशीराम पवार
मुळ गाव . दळवट ता कळवण जिल्हा नाशिक
जन्म १ जून १९३८
मृत्यू १० मे २०१७ मुंबई
राजकिय कारकिर्द
* १९६७ सरपंच दळवट ग्रामपंचायत
* १९६८ नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष
* १९७२ पहिल्यांदा आमदार पक्ष राष्ट्रीय काँग्रेस निशाणी बैल जोडी
* १९७८ दुसऱ्यांदा आमदार व शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्रीपदी निवड
* १९८० तिसऱ्यांदा आमदार व १९८३ च्या वसंत दादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास, समाज कल्याण राज्यमंत्री म्हणून निवड
* १९८५ विधानसभा निवडणुकीत पराभव झाला
* १९९० भाजपमधून चौथ्यांदा आमदार
* १९९५ पाचव्यांदा आमदार व शिवसेना भाजप युतीच्या मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात १९९८ मध्ये आदिवासी विकास मंत्री म्हणून काम पाहिले
* १९९९ राष्ट्रवादी काँग्रेस मधून सहाव्यांदा आमदार तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या मंत्रीमंडळात वन राज्यमंत्री म्हणून निवड
* २००४ सातव्यांदा आमदार सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री पदाची संधी मिळाली नाही
* २००९ आठव्यांदा आमदार तापी पाटबंधारे विभागाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जा निवड झाली
* २०१४ विधानसभा निवडणुकीत पराभव माकपचे जे पी गावित विजयी
कार्य
*१९८३ मध्ये पुणे येथे कार्यरत असलेले आदिवासी विकास विभागाचे कार्यालय नाशिकमध्ये आनले
* १९७२ मध्ये शासकीय आश्रमशाळा, वसतिगृह आदिवासी भागातील खेड्यात सुरु झाल्यानंतर त्यात सुधारणा करण्यासाठी विशेष प्रयत्न केले
* कळवण तालुक्यात शेतीसाठी सिंचन क्षेत्र वाढविले शेती व्यवसायातून रोजगार निर्मिती झाली
* पुनद धरणाचे काम पूर्ण केले त्याला अर्जुन सागर नाव दिले
* २००९ सुरगाणा तालुक्यासाठी बसस्टॉप उभारण्यात आला त्याचे उद्घाटन परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते झाले
* सुरगाणा तालुक्यात तहसील कार्यालयाची स्वतंत्र इमारत उभारली
* बारे येथे ग्रामीण जिल्हा रुग्णालयाची सुविधा केली
* इतर माहिती
२००९ मध्ये मुलगा नितीन अर्जुन पवार पंचायत समिती कळवण सभापतीपदी निवड
* २०११ सून जयश्री पवार जिल्हा परिषद अध्यक्ष निवडून आली
२०१४ सून भारती पवार यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण विजयी झाले 
* भारती पवार नाशिक जिल्हा परिषद सदस्य निवड
* २०१९ भारती पवार लोकसभा निवडणुकीत विजयी झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे धनराज महाले यांचा पराभव झाला पुढे केंद्रीय मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात आरोग्य राज्यमंत्री म्हणून निवड झाली
* २०१९ मुलगा नितीन पवार तेराव्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले

