भोयेगाव विविध कार्य.सेवा.सह.संस्था.मर्यादीत भोयेगाव ता.चांदवड. जि. नासिक या सोसायटीची चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची निवडणूक पार पडली.
चेअरमनपदासाठी
श्री. उत्तमराव भागुजी ठोंबरे व्हा.चेअरमनपदासाठी
श्री.गोविंद ममताजी निकम याची निवड झाली आहे.काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी असलेले उत्तमराव ठोंबरे यांना चौथ्यांदा चेअरमनपदावर विराजमान होण्याचा मान मिळाला आहे. यापूर्वी त्यांनी खरेदी विक्री संघाच्या संचालकपदीही कामकाज केले आहे. पोल्ट्री व्यवसायातील नामवंत व्यक्तीमत्व असलेले उत्तमराव ठोंबरे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही विकासकामे केलेली आहेत.
सोसायटीच्या संचालक मंडळाने पुन्हा ठोंबरे यांच्याकडे चेअरमनपदाची धुरा सोपविली आहे. यावेळी झालेल्या विशेष सभेला संचालक श्री.दादा रेवजी ठोंबरे ,श्री.लक्ष्मण निवृत्ती ठोंबरे,
श्री.पंढरीनाथ नाना बोरसे, श्री.शिवाजी गंगाधर गलांडे,
श्री.भावराव यशवंत ठोंबरे,
कैलास देवराम ठोंबरे,
श्री.सचिन बाळु ठोंबरे
सौ.आशा भास्कर ठोंबरे,
सौ.शंकुंतला साहेबराव निकम,
श्री.उत्तम चंदिराम केदारे हे संचालक उपस्थित होते. ग्रामस्थांनी नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
सौ.ज्योती घडवजे यांनी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले तर त्यांना सहाय्य श्री.संजय ठोंबरे (सचिव) व श्री.संदीप वक्ते (लिपिक) यांनी केले.


