शिंगवे मेसंखेडे व दहेगाव सोसायटीच्या सभापतीपदी साहेबराव ठोंबरे तर उपसभापतीपदी सखाराम कडनोर बिनविरोध
चांदवड तालुक्यातील शिंगवे मेसनखेडे खुर्द व दहेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सभापतीपदी साहेबराव ठोंबरे तर उपसभापती सखाराम कडनोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 
शिंगवे मेसंखेडे खुर्द व दहेगाव येथील सोसायटीचे मावळते चेअरमन राजेंद्र हरी गांगुर्डे. यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे .सन 2022ते 2027 पंचवार्षिक निवडणुकीत गुरुदत्त विकास पॅनलचे सर्व उमेदवार विजय झाले. नवनिर्वाचित संचालकांमध्ये कडनोर सखाराम देवचंद कलवर लक्ष्मण नारायण , ठोंबरे अंबादास पुंडलिक , ठोंबरे राजेंद्र वाळुबा, बिडगर गंगाधर तात्याबा , पगारे श्रावण किसन ,ठोंबरे साहेबराव परसराम ,थोरात शंकर , मार्कंड किसन सखाराम , मार्कंड विक्रम बाबा भागवत , आसराबाई सिताराम थोरात , रंजना बाळू ठोंबरे ,संतोष लक्ष्मण पवार हे विजय झाले असून त्यांची दिनांक 14 मे 2022 रोजी यांची सहाय्यक निबंधक अधिकारी सचिन खैरनार चांदवड यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली
त्यावेळी श्री साहेबराव ठोंबरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याला सुचक म्हणुन श्री विक्रम मार्कंड यांनी सही केली तर अनूमोदन श्री गंगाधर बिडगर यांनी केले .तसेच व्हा चेअरमण साठी सखाराम कडनोर यांनी यांनी अर्ज दाखल केला त्याला सुचक म्हणुन श्री आंबादास ठोंबरे यांनी सही केली तर अनूमोदन श्री संतोष पवार यांनी केले .दोन्हीचां एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड श्री खैरणार यांनी घोषीत केली. सचिव बी. एस .व्हंडगर. यांचे हि सहकार्य लाभले. निवड जाहीर होताच नागरिकांनी फटाके वाजुन गुलाल उधळत डिजेच्या तालावर नाचत गावात मिरवणूक काढण्यात आली.

त्याच बरोबर विठ्ठल रुक्माई. हनुमान मंदिर .व बुद्ध विहार. या ठिकाणी जाऊन सर्व संचालकांनी दर्शन घेतले .व आनंदोत्सव केला तसेच काही मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार देखील करण्यात आला. यावेळी पोलीस पाटील अनिल मारुती ठोंबरे. तंटामुक्ती अध्यक्ष वसंत ठोंबरे. सरपंच सौ भाग्यश्री अंबादास ठोंबरे श्री उत्तम आचपळे श्री रत्नाकर पगारे. मेसंखेडे बुद्रुक पोलीस पाटील सो मथुराबाई समाधान करे. तसेच माजी चेअरमन अंबादास ठोंबरे, माजी सभापती राजेंद्र गांगुर्डे,श्री राजेंद्र ठोंबरे, मा.उपसरपंच श्री जगदीश पवार, उपस्थित होते.

