[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

वाकी बुद्रुकच्या शिवशक्ती संस्थेवर ‘ बळीराजा’चे पँनलचे उत्तम ऊर्फ गणेश पंडीत वाघचौरे चेअरमनपदी तर व्हाईस चेअरमनपदी सौ सुमन अशोक आरोटे

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

वाकी बुद्रुकच्या शिवशक्ती संस्थेवर ‘ बळीराजा’चे पँनलचे

उत्तम ऊर्फ गणेश पंडीत वाघचौरे चेअरमनपदी तर व्हाईस चेअरमनपदी सौ सुमन अशोक आरोटे

चांदवड :वाकी बुद्रुक ( ता . चांदवड ) येथील शिवशक्ती विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत बळीराजा परिवर्तन विकास पॅनलने सर्व १२ जागा जिंकून विरोधी शेतकरी विकास पॅनलला पराभूत केले होते . चेअरमन व व्हा.चेअरमनपदासाठी घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत निवड संपन्न झाली.चेअरमन श्री उत्तम ऊर्फ गणेश पंडीत वाघचौरे तर व्हाईस चेअरमन म्हणून सौ सुमन अशोक आरोटे यांची निवड झाली आहे.यावेळी सर्व संचालक उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी श्री भालेराव साहेब व संस्थेचे सचिव श्री आर बी कासव साहेब यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.
बळीराजा परिवर्तन विकास पॅनेलचे नेतृत्व शिवशक्ती विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन श्री गंगाधर पाटील कोकणे, माजी व्हाईस चेअरमन श्री मधुकर पाटील आरोटे, ग्रामपंचायत वाकी बुद्रुक चे सरपंच भगवान भाऊ अहिरे , उपसरपंच संदीप भाऊ कोकणे, ग्रामपंचायत सदस्य श्री साहेबराव पाटील पोळ, गंगाधर पाटील आरोटे ,श्री चांगदेव पाटील कोकणे तसेच तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री सूर्यभान पाटील आरोटे
आदींनी बळीराजा परिवर्तन विकास पॅनलचे नेतृत्व केले . सर्वसाधारण गटातून सुमन आरोटे , मोतीराम कवडे , चंद्रभान कोकणे , भास्कर कोकणे , मारुती कोकणे , सोमनाथ कोकणे , शिवाजी पोळ , नंदू वाघचौरे , इतर मागासवर्गीय गटातून उत्तम वाघचौरे , महिला राखीव गटातून अलका वाघचौरे , बबाबाई वाघचौरे तर एससी – एसटी गटातून प्रभाकर आहिरे निवडून आले होते. निवडीप्रसंगी
मा डॉ आत्माराम कुंभार्डे ,शिवाजी पा कोकणे, गंगाधर पा कोकणे ,साहेबराव पा पोळ ,मधुकर पा आरोटे ,गंगाधर पा आरोटे ,भगवान अहिरे, संदीप कोकणे ,वाल्मिक आरोटे ,सूर्यभान आरोटे ,साहेबराव वाकचौरे ,उत्तम कोकणे, पांडुरंग कोकणे ,चांगदेव कोकणे ,शिवाजी शिंदे, धनंजय वाकचौरे ,अर्जुन वाकचौरे ,शरद आरोटे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या