आदिवासींना जंगली रानमेव्याचा दिलासा …
आदिवासी भाग हा पूर्वीपासून डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेला असल्याने ह्या आदिम बांधवांनी निसर्गाबद्दल मोठी श्रद्धा जपलेली आहे त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यातील प्रत्येक घटकाची छाप आदिवासींच्या जीवनावर पडलेली दिसते. निसर्ग नियमावर आधारित जीवनाची गुजराण करणाऱ्या आदिवासी बांधवांना वनस्पती सृष्टी बरोबरच जंगलातील इतर जीवनमूल्यांचे अधिक दाण लाभले आहे त्यात जंगली राणमेवा ( राणफळे ) हे एक वरदानच ठरले आहे.

आळव
उन्हाळी हंगामामध्ये वसंत ऋतूच्या आगमना मध्ये एप्रिल महिन्यांपासून जंगलात राण फळे यायला सुरुवात होते.आणि जून महिन्याच्या अखेरपर्यंत ही फळं पुरत असतात. रानातील फळं झाडांचा आस्वाद हा आदिवासी बांधवांना रुचकर आणि त्याची गोडी मात्र शेताबांधावरील, मळ्यातील फळापेक्षा अविटच असते . सध्याच्या काळात कोरोना रोगाची तीव्रता कमी झाल्यानंतरही बाजारातील फळांचे दर वाढलेले आहेत. अशातच जंगली फळझाडांनी आदिवासी बांधवांना आस्वाद घेण्यासाठी वर्षाकाठी नियमितपणे दिलासा दिला आहे ही फळं आदिवासी कुटुंबांना आर्थिक आधार देणारी ठरतात .

करवंद
निसर्ग उपजत असल्याने आयुवेर्दिकदृष्ट्या शरीरासाठी अतिशय जीवनसत्त्वाच्या दृष्टीने पौष्टिक ठरतात . डोंगराळ भागात, कडे कपारीत, धुंडाळून आदिवासी बांधव मिळवत असतात. बाजारात उपलब्ध असलेली जास्त किंमतीची फळं विकत घेण्यापेक्षा जंगलात बहरलेली राणफळं विनामूल्य मिळवत कोणत्याही रोगप्रतिकारक साथीला सामोरे जाण्यासाठी उपयुक्त ठरली आहेत .

तोरणं
साधारण फेब्रुवारी,मार्च महिन्याच्या दरम्यान जंगली फळझाडांना फुलं यायला सुरुवात होते.शीवाय त्याच दरम्यान अवकाळी पाऊस झाल्याने झाडांची फुलोऱ्यातील फळ गळती न होता पुर्णपणे भरुन गेली आहेत. जंगलात डोंगर कपारीत फळांनी झाड लवुन आली आहेत.
* करवंद : करवंद झाडं पुर्णपणे काटेरी असते फळाला डोंगरची काळी मैना म्हणतात. ही फळ काळ्या रंगाच्या द्राक्षासारखी आंबट, गोड,कडू चवीची आढळतात
* अळव : हे काटेरी झाड फळ चिकूच्या आकाराचे व रंगाने चॉकलेटी असतात फळं चविला आंबट, गोड असते
* टेंभरुण : टेंभरुण हे फळ फेब्रुवारी, मार्च महिन्याच्या दरम्यान झाडाला येते ते लिंबाच्या आकाराचे असते चवीला गोड, तुरट असते
* तोरणं : हे वेल वर्गीय काटेरी झाड फळ आकाराने शेंगदाण्यासारखे असते पीवळसर रंगाचे फळं मार्च महिन्यात येते खुप गोड लागते त्याच्या बिया भाजून खातात
* जांभूळ,जामूण : मे ते जून महिन्याच्या अखेरपर्यंत जांभळं काळ्या रंगानी झाडावर पकलेली आढळतात कॅन्सर सारख्या रोगांवर त्याची जीवनसत्त्व महत्वाची ठरतात मुतखडा झालेली व्यक्तीला कच्चे शेंडे कमी करण्यासाठी रामबाण उपाय ठरतात
* उंबर : हे सर्वत्र आढळते ते अंजीराच्या आकारासारखे गोड असते
* खडकपायरा : हे झाड डोंगर कपारीत किंवा खडकाच्या ठिकाणी जास्त आढळते एप्रिल,मे महिन्यात पिंपळाच्या फळासारखीच फळं येतात जुन्या ती चवीला गोड असतात पहिल्या जून्या लोकांनी वाळलेल्या फळांची भाकरी बनवून खाली होती
* हुंब : हे फळं काजूच्या आकारासारखे गोड असते एप्रिल,मे महिन्यात येते
* असंदा : हे फळ आकाराने पिकल्यावर काळ्या रंगाचे होते फेब्रुवारी, मार्च महिन्याच्या दरम्यान येते चवीला गोड, तुरट असते
* भोकर : हे फळ फेब्रुवारी, मार्च महिन्यात येते दाक्षाच्या आकारासारखे अतिशय गोड असते
* खरबाट : हे फळ रानात डिसेंबर, जानेवारी महिन्यात आढळते चवीला गोड असते त्याचा झाडाचा वाख मोळी बांधण्यासाठी काढतात
* घळघुगर : हे काटेरी फळझाड रानात दुर्मिळ आहे त्याला मार्च महिन्याच्या दरम्यानच्या कालावधीत फळं येतात पीकल्यावर लाल रंगाची असतात ती अतिशय गोड असतात
* बेल : बेलाचे काटेरी झाड सर्वच रानात आढळून येते
ही जंगली फळझाड मोठ्या प्रमाणात फळांनी बहरून गेली आहेत . सुरगाणा,पेठ, त्र्यंबकेश्वर, डांग परिसर जव्हार,मोखाडा, डहाणू,ठाणे, पालघर परिसर हा राणमेव्याने अधिक बहरून गेला आहे
सुभाष नारायण कामडी
( संशोधक )
मो नं ९५७९५४३३०८

