[masterslider id="2"]
मुख्य बातमी राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

मटका व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस कर्मचाऱ्यांस वडनेरभैरव पोलीस ठाणे हद्दीतच अटक

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

मटका व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस कर्मचाऱ्यांस वडनेरभैरव पोलीस ठाणे हद्दीतच अटक

लाचखोरांचा लज्जास्पद प्रकार

चांदवड ( प्रतिनिधी ) : – चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील पोलीस ठाण्यात शिपाई असलेल्या किसन रमेश कापसे ( वय ३२ , रा . पोलीस ठाणे वसाहत , वडनेरभैरव ) आणि संतोष दिनकर वाघ ( वय ३ ९ , रा . पोलीस वसाहत ) यांना ४० हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस ठाणे हद्दीतच अटक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे .
तक्रारदारास वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीत शिरवाडे फाटा येथे कल्याण बाजार मटक्याचा व्यवसाय सुरू करायचा असल्याने हा व्यवसाय सुरळीत चालावा , यासाठी बीट कर्मचारी पोलीस शिपाई कापसे यांनी दरमहा ८० हजार रुपयांची मागणी केली . यातील ४०
हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले . याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे . लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने , अप्पर पोलीस अधीक्षक एन . एस . न्याहळदे , वाचक पोलीस उपअधीक्षक सतीश डी . भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी सापळा रचला . त्यानुसार पोलीस हवालदार प्रफुल्ल माळी , पोलीस नाईक प्रकाश महाजन , अँन्टी करप्शन ब्युरो , नाशिकच्या पथकाने ही कामगिरी केली .

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या