[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

पाऊसाने झालेल्या नुकसानीची आ.डॉ. राहुल आहेर यांनी केली पाहणी

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

 

पाऊसाने झालेल्या नुकसानीची आ.डॉ. राहुल आहेर यांनी केली पाहणी


चांदवड( प्रतिनिधी) : -चांदवड तालुक्यात 9 जून रोजी झालेल्या जोरदार झालेल्या पावसात चांदवड तालुक्यात अनेक ठिकाणी कांद्याचे शेड, नर्सरी, शेडनेट तसेच अनेक घरांचे देखील नुकसान झाले आहे..

शनिवारी आमदार डॉ .राहुल दादा आहेर यांनी चांदवड शहर, भरवीर, तळवाडे, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झालेल्या नुकसानाची पाहणी केली.

यावेळी कृ. उ. बा. समितीचे सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे, भाजपा तालुकाध्यक्ष श्री.मनोज शिंदे, श्री.विजय धाकराव, श्री.योगेश ढोमसे, तहसीलदार श्री.प्रदीप पाटील, तालुका कृषी अधिकारी श्री.विलास सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी सर्व पंचनामे व्यवस्थित झाले पाहिजे याबाबत आमदार डॉ. आहेर यांनी सूचना केल्या

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या