अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हाचे वतीने राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पुस्तके स्पर्धा आयोजन
ईगतपुरी
(नवनाथ गायकर)
-: महाराष्ट्रातील साहित्यिक चळवळीत अग्रेसर असणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत नाशिक जिल्हा यांच्या वतीने राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पुस्तके स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
सदर स्पर्धेत सहभागी होण्या साठीच्या प्रकाशित पुस्तकाचां कालावधी जानेवारी २०२० ते जुन २०२२ या अडीच वर्षाचा आहे.या स्पर्धेत स्पर्धक
कथासंग्रह, कविता संग्रह, बालसाहित्य, ललित, आत्मचरित्र, कांदबरी, पर्यटन आदिसह अन्य कुठल्याही विषयावरील कोणतीही प्रकाशित पुस्तके पाठवु शकतात. या शिवाय अनुवादित प्रकारातील पुस्तके ही चालतील.
३० जुलै २०२२ ही पुस्तके पाठवण्याची शेवटची तारीख आहे.किमान ३ पुस्तके पाठवणे बंधनकारक आहे.
पुस्तके खालील पत्त्यावर पाठवावे.पत्ता…
नवनाथ अर्जुन पा.गायकर
आहुर्ली, पो.सांजेगाव
ता.ईगतपुरी, जि.नाशिक
पिन कोड-४२२ ४०२
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सहभागी शुल्क
रुपये १०० रु आहे.ते सहभागी शुल्क *मो.नं.9881329709* या नंबर वर फोनपेने पाठवावे.
स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण आँक्टोबर २०२२ मध्ये त्याच महिन्यात आयोजित ११ व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल.पुरस्काराचे स्वरूप
प्रत्येक प्रकारात प्रथम क्रमांकाचे एक बक्षीस असेल. ज्याचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ असे असेल.तसेच प्रत्येक प्रकारात किमान पाच बक्षिसे काढण्यात येईल. याचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ असे असेल.(यात रोख रक्कम नसेल.)
सहभागी सर्वानाच सन्मानपत्र दिले जाईल.तसेच विजेत्या पुस्तकाचां समावेश (फक्त प्रथम क्रमांक)अल्पपरिचय साहित्य परिषद दिवाळी अंक २२ यात करण्यात येईल.
स्पर्धेत सहभागासाठी
एकच साहित्यिक विविध प्रकारातील किंवा एकाच प्रकारातील एकापेक्षा जास्त पुस्तके ही पाठवु शकतात.
आधिक माहिती साठी मो.नं. 9881329709 (व्हाँटसप) किंवा 9763827708 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

