पर्यावरणाचे संस्कार विद्यार्थीदशेतच विद्यार्थ्यांवर ती व्हावे म्हणून जाणीवपूर्वक पर्यावरण जतन आणि संवर्धनाचा उपक्रम म्हणून कर्मवीर राजाराम सखाराम वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्थेच्या बी के कावळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सन 2022 व 2023 शैक्षणिक वर्षात एक विद्यार्थी एक झाड हा उपक्रम राबविणार आहे यासाठी बी के कावळे विद्यालय तील सर्व विद्यार्थ्यांना 15 जून 2022 प्रवेशाच्या दिवशीच या उपक्रमाची माहिती देऊन पाठ्यपुस्तक व पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे तसेच या पावसाळ्यात विद्यार्थ्यांनी जमा उन्हाळ्यात जमा केलेल्या विविध झाडांच्या बिया म्हणजेच विद्यालयाची सीड बँक यामार्फत मोकळ्या माळरानात व जिथे शक्य आहे तिथे विद्यार्थ्यांकडून बियांचे जाणीवपुर्वक रोपण केले जाणार आहे हा उपक्रम राबवण्याचा हेतू विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच पर्यावरण घटकांचा विशेषता वृक्षारोपण जाणीवजागृती व्हावी हा हेतू त्या पाठीमागे आहे विद्यार्थ्यांनी लावलेले झाड आणि त्याचे केलेले संगोपन याची माहिती कार्यानुभव व हरित सेने मार्फत ठेवून त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे या उपक्रमात इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत विद्यार्थी सहभागी केले जाणार आहे दिंडोरी तालुक्यातील एक मुल एक झाड राबविणारी बी के कावळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ही शाळा प्रथमच असणार आहे अशी माहिती प्राचार्य बीके शेवाळे यांनी सोमवार दिनांक 13 जून रोजी झालेल्या शिक्षक सहविचार सभेत दिली व सर्व वर्गशिक्षक आणि विशेष शिक्षक यांनी या उपक्रमाची यशस्विता जोपासण्याचे आवाहन केले 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत ही सर्व झाडे विद्यार्थी लावणार आहेत तर भारत देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहे म्हणून आपल्याच परिसरातील 75 औषधी वनस्पतींचे रोपण देखील विद्यालयात केले जाणार आहे या बैठकीला पर्यवेक्षिका श्रीमती व्ही आर जाधव विद्यालय चे सर्व वर्ग शिक्षक व विषय शिक्षक उपस्थित होते वर्षभराच्या सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा उपक्रमांच्या नियोजना साठी ही बैठक आयोजित करण्यात आली

