[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

बी के कावळे विद्यालयात मुलींचा डंका.. दहावीचा ९८% निकाल

बी के कावळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 98 टक्के लागला असून पहिल्या पाच गुणवत्ताधारक मध्ये येण्याचा मान मुलींनी मिळविला आहे अशी माहिती प्राचार्य बीके शेवाळे पर्यवेक्षिका श्रीमती व्ही आर जाधव यांनी दिली कादवा कारखाना कार्यस्थळावर असलेले बी के कावळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजाराम नगर येथील इयत्ता दहावी चा निकाल मंडळाकडून जाहीर करण्यात आला असून 182 विद्यार्थी या परीक्षेत बसलेले होते त्यापैकी तीन विद्यार्थी नापास झाले तर 179 विद्यार्थी उत्तीर्ण झाले विद्यालयाचा शेकडा निकाल 98. 35 टक्के इतका लागला आहे विद्यालयात पहिले पाच गुणवत्ताधारक विद्यार्थिनी पुढील प्रमाणे दिवटे सलोनी विजय 485 गुण शिरसागर राधिका ज्ञानेश्वर 483 गुण काळोखे गायत्री भाऊदास 475 गुण शिवले श्रावणी बाजीराव 473 गुण देशमुख अनुष्का शंकर 469 गुण सर्व गुणवत्ताधारक व उत्तीर्ण विद्यार्थी इयत्ता दहावीचे वर्ग शिक्षक व विषय शिक्षक यांचे अभिनंदन कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे व्हाईस चेअरमन शिवाजी दादा बसते तर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शहाजी दादा सोमवंशी उपाध्यक्ष सुभाषजी शिंदे सचिव बाळासाहेब उगले यांच्यासह सर्व संचालक मंडळ पालक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे तर प्राचार्य बीके शेवाळे यांनी निकाल जाहीर होताच सर्व शिक्षकांच पुष्प देऊन स्वागत व अभिनंदन केले केंद्रप्रमुख म्हणून श्रीमती व्ही आर जाधव यांनी राजाराम नगर सोनजांब मातेरेवाडी बोपेगाव वरखेडा जोपुळ या शाळांचे मुख्याध्यापक विषय शिक्षक व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या