[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

गंगावे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रघुनाथ (अण्णा) आहेर

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

निवडीनंतर आनंद उत्सव साजरा

चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गंगावे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रघुनाथ ( अण्णा )आहेर यांची बिनविरोध निवड झाली आहे. सदर निवड मागील सभेत झाली नव्हती. उपसभापती यांची निवड झाली होती , त्यावेळी अण्णा राजाराम शेलार यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली होती. चेअरमन निवडीसाठी पुन्हा विशेष सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी गंगावे गावातील तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असणारे खरेदी विक्री संघाचे चेअरमन भाऊसाहेब शेलार ,भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष सुनील शेलार व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक सचिव रघुनाथ अण्णा आहेर यांनी राजकीय विरोध बाजूला ठेवून गावात एकोपा निर्माण करण्याच्या दृष्टीने पावले उचलत यावेळेस बिनविरोध निवड करण्यात आली . चेअरमन यांची निवड बिनविरोध झाली असली तरी यापूर्वीही संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले होते . गंगावे सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झालेले रघुनाथ अण्णा आहेर हे समता परिषदेचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी आहेत. त्यामुळे गावात भाजप ,काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस सर्वच पक्षांनी एकत्र येत गावात एकोपा निर्माण करण्याच्या दृष्टीने ही निवड बिनविरोध केली आहे. चेअरमन निवडीच्या विशेष सर्वसाधारण सभेचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती योगिता खैरनार यांनी पाहिले ,तर त्यांना सहाय्य सचिव वालचंद राजोळे यांनी केले. गंगावे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन रघुनाथ (आण्णा)मोहन आहेर,व्हा चेअरमन अण्णा राजाराम शेलार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बैठकीस संचालक मंडळ रामदास नरोटे ,भाऊसाहेब जाधव,रामदास आहेर,शांताराम शेलार,मंदाबाई जाधव, भाऊसाहेब शेलार , संजय जाधव, रावसाहेब शेलार , अशोक नरोटे , म्हसु उबाळे , जिजाबाई बडे हे उपस्थित होते.


निवड झाल्यानंतर त्यांचे ग्रामस्थ व तालुक्यातील जनतेने अभिनंदन व सत्कार केला .निवडी प्रसंगी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजय जाधव ,भाजपचे माजी तालुका अध्यक्ष सुनील शेलार, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन भाऊसाहेब शेलार ,नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक शिवाजी कासव ,पंकज घुले, किरण आहेर ,गोरख शिंदे ,केशव बडे ,प्रवीण नरोटे ,वैभव आहेर, भगवान नरोटे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या