निमोण सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी कांतीलाल निकम
चांदवड (प्रतिनिधी ) : – चांदवड तालुक्यातील निमोण विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी सोसायटीचे माजी चेअरमन कांतीलाल म्हातारबा निकम यांची नियुक्ती झाली आहे सोसायटीच्या मासिक बैठकीत संचालक मंडळाने एकमुखाने सदर ठराव पारित केला. कांतीलाल निकम यांची तज्ञ संचालक पदी नियुक्ती करावी ,अशा आशयाचा ठराव संस्थेचे चेअरमन दत्तू सोनवणे यांनी मांडला ,तर त्यास अनुमोदन राघो ठाकरे यांनी दिले .तसेच निकम यांची निवड झाल्याबद्दल संचालक मंडळाने त्यांचा सत्कार केला. निमोन विविध कार्यकारी सोसायटीची मासिक सभा संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती .संस्थेचे सचिव वालचंद्र राजोळे यांनी सभेचे कामकाज पाहिले. त्यांना सहाय्य लिपिक विलास देवरे यांनी केले. यावेळी बैठकीस संस्थेचे चेअरमन दत्तू सोनवणे व व्हाईस चेअरमन हरिभाऊ शेळके तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते .यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली तसेच संस्थेच्या तज्ञ संचालक पदी निवड करण्याचा ठराव मांडण्यात आला यावेळी सर्वानुमते कांतीलाल निकम यांची तज्ञ संचालक पदी निवड करण्यात आली. सदर बैठकीस रतन एकनाथ आहेर , राघो चेंडू ठाकरे , दिलीप विठ्ठल देवरे , वाल्मीक महादू शेळके , हरिभाऊ पांडुरंग शेळके , दत्तात्रय मुरलीधर सोनवणे , बाबूराव काळू सोनवणे , हिरामण कचरू सोमासे , गयाबाई कौतिक काळे , वत्सलाबाई हिरामण देवरे , शिवाजी काळू सोनवणे , अशोक बळवंत उगले , पंडितराव सोनवणे हे उपस्थित होते.

