सचिवपदी रामेश्वर बाचकर तालुका महासंघ अध्यक्षपदी विजयराज जाधव
ईगतपुरी -(नवनाथ गायकर )
ईगतपुरी तालुका ग्रामसेवक संघटनेची नुकतीच बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी ग्रामसेवक दिपक पगार यांची तर सचिव पदी रामेश्वर बाचकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. 
इगतपुरी तालुका ग्रामसेवक संघटनेच्यावतीने इगतपुरी येथे सेवानिवृत्त झाल्याबद्दल ग्रामसेवक ईश्वर पाटील याचा सेवापुर्ती कार्यक्रम इगतपुरी पंचायत समितीमध्ये संपन्न झाला. यावेळी इगतपुरी तालुक्यात नव्याने हजर झालेले व बदली करून गेलेले ग्रामसेवक बंधू भगिनी यांचे स्वागत व निरोप समारंभ कार्यक्रमही पार पडला.
यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेची इगतपुरी तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली. 
ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास वाघचौरे, जिल्हा महासंघाचे अध्यक्ष अरुण आहेर, पतसंस्था कोषाध्यक्ष प्रमोद ठाकरे, ग्रामसेवक तलु काका, पारधी व सर्व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारिणीची निवड खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली.
इगतपुरी तालुकाध्यक्षपदी दिपक पगार, सचिवपदी रामेश्वर बाचकर, कार्याध्यक्ष हनुमान दराडे, उपाध्यक्षपदी घडवजे भाऊसाहेब, महिला उपाध्यक्षपदी सुरेखा चव्हाण, महिला सहसचिवपदी कलंकार, कायदेशीर सल्लागारपदी ऋषीकेश नागरे व तालुका महासंघाचे अध्यक्ष म्हणून विजयराज जाधव यांनी बिनविरोध निवड झाली.
नूतन पदाधिकाऱ्यांना इगतपुरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

