दरेगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त दिंडी संपन्न
दरेगाव येथील आषाढी एकादशीनिमित्त निघणाऱ्या हनुमान मंदिर ते योगेश्वर मंदिर सलग पायी दिंडीस आज 66 वर्ष पूर्ण झाली. 1956 पासून सलग सदर दिंडी गावातील वारकरी मंडळी दरवर्षी नित्यनेमाने हनुमान मंदिरापासून सुरुवात करत गावातून भजने गात स्वाध्याय परिवाराच्या अमृतालयम् या केंद्रापर्यंत दिंडी जात असते.
गावातील भजनी मंडळात वयोवृद्धापासून तरुणांपर्यंत सर्वांचा सहभाग असतो .विविध भक्ती पर भजने यावेळी संपन्न होतात. तसेच दिंडीच्या सांगतेच्या वेळी हनुमान मंदिराजवळ फुगडी खेळण्याचा आनंदही वारकरी मंडळी घेतात . सदर दिंडी ही 1956 पासून आज पर्यंत सलग चालू असल्याची माहिती 87 वर्षीय जेष्ठ भजनी मंडळातील सदस्य उत्तमबाबा गांगुर्डे यांनी दिली . तसेच 1956 पूर्वीही ही दिंडी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 1956 रोजी गावातील बहुतांश भजनी मंडळी पंढरपूरलाही गेली होती. तेव्हापासून तर आजपर्यंत सदर दिंडीची परंपरा दरवर्षी नित्यनेमाने सुरू असून आजही सदर दिंडी उत्साहात पार पडली.


