[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

हायमास्ट संदर्भात शिवसेनेने दिले चांदवड नगरपरिषदेला कंदील भेट….

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

हायमास्ट संदर्भात शिवसेनेने दिले चांदवड नगरपरिषदेला कंदील भेट….

मुख्याधिकारी चांदवड नगरपरिषद ऋषिकेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. चांदवड शहरातील मुख्य चौकातील हाय मस्ट वरचे एलईडी मर्क्युरी चोरी व परस्पर विक्री झाल्याबद्दल शहर शिवसेनेतर्फे नगरपरिषदेचे अधिकारी राजपूत मॅडम व श्री.सिंग यांना कंदील भेट देऊन निवेदन देण्यात आले.
चांदवड शहरातील श्री संत गाडगेबाबा चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक सार्वजनिक वाचनालय बस स्टॅन्ड हत्तीखाना देवी खुंट वरचे गाव या मुख्य चौकात चांदवड नगरपरिषदेने एक ते दीड वर्षा पुर्वी हाय मस्ट लावलेले असून त्यामुळे चौक हे सर्व प्रकाशमय झालेली होती चोऱ्यामाऱ्यांचे प्रमाण शहरात कमी प्रमाणात होते पण अज्ञातांनी ह्या एलईडी मरकुरी चोरून नेऊन विक्री केल्याने सर्व चौक अंधारमय झालेले आहे. या अंधाराचा फायदा घेऊन शहरात मोठ्या प्रमाणात चोऱ्या होऊ शकता त्याकरिता कृपया अज्ञात चोरांना पकडून त्यांच्या वरती गुन्हा दाखल करण्यात यावा व लवकरात लवकर परत चौका चौकात एलईडी मरकुरी लावण्यात यावी ही नम्र विनंती असं न झाल्यास चांदवड शहर शिवसेनेतर्फे उग्र स्वरूपाच्या आंदोलन छेडण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख श्री.संदिप (तात्या)उगले शिवसेना शहर संघटक श्री.प्रसाद प्रजापत शिवसेना उप-शहरप्रमुख श्री.सचिन (गुड्डू) खैरनार श्री.दिपक (नाना) शिरसाठ श्री.शंभूराजे खैरे श्री.पांडुरंग भडांगे वाहतूक सेनेचे श्री.अकबरभाई पठाण श्री.विष्णुभाऊ कोतवाल युवासेना उप-जिल्हाधिकारी श्री.चंद्रकांत देवरे श्री.संदिपभाऊ पवार श्री.दिपक भोयटे आदींसह नागरिक उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या