चांदवड तालुका हा नासिक जिल्ह्यात असणे आवश्यक आणि तीच चांदवडकरांची आणि चांदवडची अस्मिता – सीए. शांताराम ठाकरे
आम्ही चांदवड तालुक्यातील रहिवासी असून मला व तालुक्यातील जनतेला माझ्या चांदवड बद्दल व नासिक बद्दल सार्थ अभिमान आहे. सद्या मालेगाव जिल्हा निर्मितीसाठी खटाटोप चालु आहे. आमचा मालेगाव जिल्हा निर्मितीसाठी विरोध नसून शुभेच्छा आहे.परंतु कुठल्याही परिस्थितीत चांदवड तालुका हा मालेगाव जिल्ह्यात समाविष्ठ करता कामा नये कारण ती लोकभावना आहे आणि तिचा आदर शासनकर्त्यांनी कुठल्याही परिस्थितीत करायलाच हवे
आम्हाला नासिक जिल्हा का हवा आहे याबाबत त्यांनी विविध कारणे दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की
नासिक ही आमची धार्मिक राजधानी आहे नासिक आमची दक्षिण काशी आहे.
श्रीप्रभूरामचंद्र असतील श्रीरामभक्त हनुमान असतील त्रंबकेश्वर ब्रह्मगिरी अंजेनरी काळाराम मंदिर असे अनेक धार्मिक अधिष्ठाण येथे आहे.तेच आमचे जीवन आहे.
नासिक ही संतांची भुमी आहे जगतगुरु संत जनार्दन स्वामी संत निवृत्ती नाथ महाराज आशा अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे.आणि त्या भूमीशी आणि संताशी आमचे अतूट नाते आहे.
नासिक आमची औद्योगिक नगरी आहे नासिक आमची कृषीपंढरी आहे नासिक आमचे विद्येचे माहेर घर आहे नासिक आमचे पर्यटन आहे आणि तोच आमचा श्वास आहे.
असे अजून बहुतेक बाबी आहेत त्यामुळे आम्ही चांदवडकर नासिक मध्ये होतो आहोत आणि राहू हा आमचा चांदवडकरचा दृढ निश्चय असल्याचे शिवसनेचे माजी तालुकाप्रमुख सीए शांताराम दगु ठाकरे ( गणुर ) यांनी सांगितले आहे.

