चांदवड तालुक्यातील हिरापूर ठरले तालुकास्तरीय प्रथम सुंदर ग्रामपंचायत
आर आर (आबा )पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना तालुकास्तरीय प्रथम सुंदर ग्रामपंचायत व जिल्हास्तरीय प्रथम सुंदर ग्रामपंचायत पुरस्कार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय समितीकडून घोषित करण्यात आले आहे. सन 2021/22 या वर्षात आर आर (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील हिरापूर या ग्रामपंचायतीस तालुका स्तरीय सुंदर गाव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे . नाशिक येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. सदर पुरस्कारासाठी हिरापूर गावचे सरपंच श्री रंगनाथ धोंडीराम थोरात ,उपसरपंच सोनाली संदीप शिंदे ,सौ अनिता चव्हाण ,संगीता चव्हाण, सुनिता कांगणे, श्री भाऊसाहेब पिंपळे, अरुण थोरात, सौ स्वप्नाली चव्हाण, श्री उत्तम चव्हाण, श्रीमती आम्रपाली देसाई ग्रामसेवक व कर्मचारी , व हिरापूर गावचे खंबीर साथ देणारे सर्व ग्रामस्थ यांनी उत्कृष्ट काम करून गावाचे नाव तालुक्यात प्रथम क्रमांकावर आणले .

