शिंगवे विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
दिनांक 15/8/2022 सोमवार रोजी माध्यमिक विद्यालय शिंगवे तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथीलइयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे लेझीम पथक तसेच घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली.त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आवारे.यु.एच. यांच्या मार्गदर्शनाने सरस्वती प्रतिमापूजन सरपंच श्रीमती नीता पाटील, नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे प्रतिमापूजन संचालक श्री तुकाराम तात्या खताळ,भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन श्री सुकदेव नाना बोरसे यांनी केले,
सोसायटीचे चेअरमन श्री संजय अहिरे यांनी ध्वज पूजन केले. श्री गुरुदेव दत्त प्रसारक मंडळ शिंगवे संस्थापक अध्यक्ष श्री.बी.डी.कुलकर्णी सर यांनी ध्वजारोहण केले तसेच स्काऊटचे ध्वजारोहण कुमार प्रतीक मढे या विद्यार्थ्यांने केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तळेगाव रोही हायस्कूलचे माजी शिक्षणाधिकारी श्री चंद्रभान मढेसर यांनी स्वीकारले.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.तसेच मार्च 2022 एस.एस.सी उत्तीर्ण एक ते पाच विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी सैन्य दलातील श्री मढे, श्री खताळ तसेच पोलीस दलातील कर्मचारी,गावातील मान्यवर ग्रामस्थ,संस्थेचे संचालक मंडळ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,अंगणवाडी सेविका,आशा सेविका उपस्थित होते.

