चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वेदांत फ़ॉक्सकॉर्न प्रकल्प महाराष्ट्र सोडून गुजरातला गेल्याचां निषेध व्यक्त करत नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करावे लंपी आजारावर जनावरांसाठी मोफत लस व भरपाई द्यावी व जिल्हा नियोजन मंडळाच्या मंजूर कामाची स्थगिती उठवावी या मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन
महाराष्ट्रात लाखो कोटींचा उद्योग सुरू करून तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणारा वेदांत फ़ॉक्सकॉर्न प्रकल्प महाराष्ट्र सोडून गुजरातला गेल्याचे वृत्त म्हणजे महाराष्ट्र राज्य- सरकारचे अपयश असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे याचा निदर्शन आंदोलन करून आम्ही निषेध करत असून केंद्र सरकारकडे मध्यस्थी करून हा वेदांत फ़ॉक्सकॉर्न प्रकल्प महाराष्ट्रातच आणावा असे आवाहन आम्ही करत आहोत .
पाऊसने शेतपिकांचे नुकसान झाल्याने कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या असल्याने नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे व शेतकऱ्यांना ५० हजार रुपये एकरी नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारने मदत द्यावी अशी मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करत आहोत .
लंपी आजारामुळे शेतकऱ्यांची गुरे मरत असून त्यांना सरकारने त्वरित भरपाई द्यावी तसेच या आजाराची लस सरकारतर्फ मोफत उपलब्ध करून द्यावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे . जिल्हा नियोजन मंडळाच्या मंजूर कामांना मा.मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने नाशिक जिल्ह्यातील सर्व कामे व पावसाळ्यातील कामे बंद पडल्याने नागरिकांचे हाल होत आहेत या सर्व कामांची स्थगिती तात्काळ उठवण्यात यावी व त्वरित पालकमंत्री नियुक्त करून नाशिक जिल्ह्यातील सार्वजनिक कामांना सुरुवात करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस करीत आहे. वरील बाबीमध्ये त्वरित कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम्ही देत आहोत . अशा आशयाचे निवेदन तहसीलदार प्रदीप पाटील यांना देण्यात आले आहे. यावेळी चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ . सयाजीराव गायकवाड
सरचिटणीस विजय जाधव,
दत्तात्रय वाकचौरे,
ऍड नवनाथ आहेर ,मधुकर टोपे,
शैलेश ठाकरे, विक्रम जगताप ,अनिल पाटील ,दिलीप शिंदे ,देवमन पवार ,रिजवान घासी ,प्रकाश शेळके ,आर डी थोरात ,सुधीर कबाडे, विकी जाधव ,संदीप शिंदे ,रमेश वाकचौरे ,हरी निकम ,राजेंद्र ठोंबरे ,कैलास सोनवणे ,चेतन देशमाने ,अल्ताफ तांबोळी, दशरथ ठाकरे ,सुरेश गांगुर्डे ,वसंतराव जाधव आदीं उपस्थित होते.

