[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

शालेय विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास सुविधा द्या ! राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

इयत्ता पहिली ते पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विदयार्थ्यांना मोफत बस प्रवास सवलत देण्यात यावी , अशी मागणी निवेदाद्वारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे करण्यात आली

शालेय विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास सुविधा द्या ! राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

महाराष्ट्र राज्यात गेल्या दोन वर्ष कोव्हीड 19 साथीच्या आजाराचे थैमान सुरु होते.याकाळामध्ये महा विकास आघाडी शासनाने सामान्य जनतेला योग्य ती मदत तत्पर उपलब्ध करून दिली होती.परंतु या साथीच्या आजारामध्ये अनेक विदयार्थ्यांनी आपले पालक गमावले आहे.अनेकांनी आपला रोजगार गमवला आहे.आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अनेक विद्यार्थी शाळाबाह्य झाले आहेत. सद्य परिस्थिती मध्ये जे मुले,मुली शिक्षण घेत आहे. त्याना शैक्षणिक खर्च पेलविणे अशक्य प्राय झाले आहे.याशिवाय अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी व सर्व सामान्य जनता पूर्णतः हवालदिल झाली आहे.
महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे कि 75 वर्ष वरील नागरिकांना मोफत बस प्रवास सवलत आपण जाहीर केली आहे.याप्रमाणे इयत्ता पहिली ते पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विदयार्थ्यांना मोफत बस प्रवास सवलत देण्यात यावी ,अशी मागणी निवेदाद्वारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष दत्तात्रय वाघचौरे, विक्रम जगताप ,चेतन देशमाने, चागंदेव खागांळ ,शैलेश ठाकरे, अनिल पाटील ,संदिप शिंदे, प्रकाश शेळके ,सूधिर कबाडे , रिजवान घासी ,नवनाथ आहेर ,आल्ताफ तांबोळी, विकी जाधव ,रमेश वाकचौरे ,कैलास सोनवणे, सूरेश गागुंर्ड आदी उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या