[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

मनमाड हायवेलगतचा चांदवड – बोपाणे रस्ता वहिवाट खुला करावा व मोठा गटार नाला बंदिस्त करावा

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

17 बंगले च्या बाजूंनी बोपाणे गावाकडे जातो ,परंतु जागेवर सद्यस्थीत मनमाड हायवे पासून , सदर ठिकाणी आताच पुलाचे काम झाल्याने नाला गटार देखील तुटला आहे , आज रोजी दोन्ही बाजूने अतिक्रमण झाल्याने रस्ता शिल्लक दिसत नाही

मनमाड हायवेलगतचा चांदवड – बोपाणे रस्ता वहिवाट खुला करावा व मोठा गटार नाला बंदिस्त करावा

महालक्ष्मी नगर ,डावखर नगर ,जय हनुमान सोसायटी येथील महिला व नागरिकांनी नगरपरिषद हद्दीतील मनमाड हायवेलगतचा चांदवड -बोपाणे रस्ता (12 मीटर) वहीवाटी खुला करून व मोठा नाला गटार बंदिस्त करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन दिले . चांदवड – मनमाड हायवेलगत 12 मीटर चा चांदवड – बोपाणे रस्ता हा पूर्वापारपासून अस्तीत्वात आहे. सदर रस्ता हा चांदवड शहराच्या गाव नकाशा ,DPR रेकॉर्ड वरती देखील आहे. त्याला अनुसरून पूर्वापारापासून आजपर्यंत काही गट कायदेशीर बाबी पूर्ण करून सर्व परवानगी घेऊन रहिवासी वापरासाठी बिनशेती करण्यात आलेले आहे व त्यावरून लेआऊट मंजूर करण्यात आलेले आहेत. पूर्वीपासून सदर रस्त्याची वहिवाट चालू होती .

सदर चांदवड – बोपाणे रस्ता डीपीआर रेकॉर्ड व भूमी अभीलेख कार्यालय चांदवड यांच्या रेकॉर्ड वर देखील सदर रस्त्याची नोंदणी आहे .गावनकाशा,आजू बाजूचे सर्व गट,लेआऊट विचारात घेता पहिलेपासून,चांदवड – मनमाड हायवे ला खेटून गट क्र 366 आहे त्याला खेटून नाला आहे . व गट क्र 602 हा आहे या दोन्ही गटाच्या मध्ये सदर चांदवड – बोपाणे रस्ता यांच्या मध्ये सुरू होऊन खालच्या पश्चिम बाजूला गट क्र 367/3 व गट क्र 571/2/3/2/2 यांना लागून पुढे गट क्र367/2 ला खेटून आहे व तो पुढे 17 बंगले च्या बाजूंनी बोपाणे गावाकडे जातो ,परंतु जागेवर सद्यस्थीत मनमाड हायवे पासून , सदर ठिकाणी आताच पुलाचे काम झाल्याने नाला गटार देखील तुटला आहे , आज रोजी दोन्ही बाजूने अतिक्रमण झाल्याने रस्ता शिल्लक दिसत नाही . सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे .रहिवासी प्लॉटधारकांना खूप त्रास होत आहे गटरीचे पाणी दारात साचत आहे खूप फरफट होत आहे जायला यायला रस्ता नाही .हायवेवरुण डाउन रम्प करावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

आशा आशयाचे निवेदन रहिवासी ग्रामस्थ महिला व नागरिकांनी मुख्याधिकारी यांना आज दिले आहे निवेदनावरती सुहास म्हसके ,मिचकुल सुरेश ,रमन जाधव ,किशोर जाधव,वाय.स.आवारे,राहुल हांदगे,प्रशांत ठाकरे ,शीतल डुंगरवाल,पंढरीनाथ साठे सोमनाथ पेंढारी,विजय कोटकर,गजानन ठाकरे,मेहबूब खान,पुंडलिक ठाकरे,प्रसाद जाधव,तुळशीराम शेलार ,नितिन चव्हाण ,अनिल कोतवाल इत्यादि स्वाक्षरी केली आहे .

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या